News Flash

IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची ‘इतक्या’ वेळा होणार करोना टेस्ट

प्रत्येक खेळाडूच्या ६० टक्के चाचण्या संघ व्यवस्थापनातर्फे

IPL 2020ची अधिकृत घोषणा रविवारी करण्यात आली. IPL गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी झालेल्या बैठकीत युएईमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तेराव्या हंगामाची अधिकृत घोषणा केल्यानंतर या स्पर्धेला केंद्र सरकारनेही परवानगी दिली. १९ सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर स्पर्धेचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांना २० ऑगस्टनंतर युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचदरम्यान करोनाचा धोका लक्षात घेता मुंबई इंडियन्सच्या संघ व्यवस्थापनाने युएईला जाण्याआधी खेळाडूंची पाच वेळा करोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

करोनाचा वाढता प्रभाव ध्यानात घेत मुंबई इंडियन्स संघाच्या व्यवस्थापन समितीने काही विशेष गोष्टी ठरवल्या आहेत. त्याबद्दल संघ व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्याने आयएएनएस वृत्तसंस्थेला माहिती देताना म्हटले, “भारतीय खेळाडू आता हळूहळू मुंबईत यायला सुरूवात झाली आहे. या सर्व खेळाडूंना १४ दिवस होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे. खेळाडूला करोना चाचणी केल्यानंतरच रूम किंवा हॉटेलच्याबाहेर पडू दिलं जाणार आहे. रूममध्येदेखील चाचणीला लागणारे साहित्य पुरवण्यात येणार आहे.”

“टीम इंडियाचे खेळाडूदेखील लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांनादेखील १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी सक्तीचा असणार आहे. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर खेळाडूंना तंदुरूस्त असल्याचं सर्टिफिकेट देऊन सराव सत्रात सहभागी होता येणार आहे”, असेही त्यांनी सांगितलं.

“करोनाचा धोका लक्षात घेता मुंबईत दाखल होण्याआधी खेळाडूंना दोन वेळा घरीच (राहत्या शहरात) करोना चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर मुंबईत दाखल झाल्यानंतर ठराविक अंतराने तीन वेळा खेळाडूंची करोना चाचणी करण्यात येणार आहे. काही ठिकाणी घरी किंवा राहत्या शहरात खेळाडूंना करोना चाचणी जमणार नाही अशी शक्यता आहे. पण आम्ही खेळाडूंच्या एकूण पाच करोना चाचणी झाल्यानंतरच युएइला उड्डाण करणार आहोत”, असे पदाधिकारी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 4:55 pm

Web Title: mumbai indians players will be tested for covid 19 5 times before flying to uae for ipl 2020 rohit sharma hardik pandya kieron pollard jasprit bumrah vjb 91
Next Stories
1 युजवेंद्र चहल म्हणतो, कसोटी क्रिकेटसाठी लागणारा संयम माझ्याकडे आहे !
2 काश्मीर वादाच्या प्रश्नावर आफ्रिदीचं उत्तर, म्हणाला…
3 Video : घालीन लोटांगण… गोलंदाजाचा खतरनाक यॉर्कर अन् फलंदाज ‘क्लीन बोल्ड’
Just Now!
X