सात वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स आरआर यांच्यात एक अविस्मरणीय सामना झाला होता. मुंबईने हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. त्या सामन्यातल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात संघाचा फलंदाज आदित्य तारे हा सामना जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करतानाचा फोटो आहे.

या सामन्यात मुंबईने १४.४ षटकांत १९५ धावा करुन प्लेऑफ तिकीट पक्के केले होते. यात तारेची भूमिका महत्त्वाची ठरली होती. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जेम्स फॉल्कनरच्या १५व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार मारत त्याने संघाला प्लेऑफमध्ये पोहोचवले. त्यानंतर तारेने जर्सी डोक्यावर घेत मैदानात फुटबॉलपटूप्रमाणे सेलिब्रेशन केले होते.

 

राजस्थान रॉयल्सचे उत्तर

मुंबईच्या या पोस्टवर राजस्थान रॉयल्सनेही उत्तर दिले आहे. त्यांनी शेअर केलेल्या मीममध्ये काही लोक त्यामध्ये रडताना दिसत आहेत. ”हां, भाई पता है”, असे त्यांनी मीममध्ये म्हटले आहे. २०१४मधील हा सामना मुंबई इंडियन्ससाठी खूप महत्वाचा होता. कारण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना हा सामना चांगल्या रन रेटने जिंकावा लागणार होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ४ गडी गमावून १८९ धावा केल्या. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला हे लक्ष्य १४.३ षटकांत गाठावे लागणार होते. मुंबईने १४.३ षटकांत १८९ धावा करून सामना बरोबरीत आणला.

 

प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी मुंबईला पुढच्याच चेंडूवर चौकार आवश्यक होता. स्ट्राईकवर आदित्य तारे आपला पहिला चेंडू खेळणार होता. त्याने फॉल्कनरला षटकार चौकार लगावला आणि हा सामना जिंकला. दुसर्‍या टोकाला असेलल्या कोरी अँडरसनने ४४ चेंडूत नाबाद ९५ धावा केल्या.

हेही वाचा – “माझ्यात आणि व्यंकटेश प्रसादमध्ये कोणताही वाद झाला नव्हता”

हेही वाचा – IPL खेळण्याचं स्वप्न पाहणारा मोहम्मद आमिर आता ‘या’ टी-२० लीगमध्ये खेळणार