सध्या देश लॉकडाउनमध्ये आहे. करोना विषाणूने सध्या जगभरात दहशत निर्माण केली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. काही खेळाडू IPL खेळवण्याच्या बाजूने आहेत, तर काहींना अशा कठीण प्रसंगी IPL खेळवलं जाऊ नये असं वाटत आहे. पण सध्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून IPL चे आयोजन अनिश्चित काळासाठी लांबणीवर ढकलण्यात आले आहे.

टी २० विश्वचषकाच्या संघात धोनीला स्थान; सुनील शेट्टीने निवडला संघ

IPL चे आयोजन पुढे ढकलण्यात आल्याने सर्व क्रिकेटपटू घरात आहेत. ते सोशल मिडिया आणि लाइव्ह चॅटच्या माध्यमातून एकमेकांशी व चाहत्यांशी संपर्क साधताना दिसत आहेत. नुकताच भारताचा उपकर्णधार व मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार व सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याच्याशी इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी IPL बद्दल खूप साऱ्या गप्पा मारल्या. यावेळी रोहितने एक खास गोष्ट त्याला आणि चाहत्यांना सांगितली.

पैलवान सुरेश रैनाचा भन्नाट फोटो पाहिलात का?

वॉर्नर म्हणाला की यंदाचं IPL झालं पाहिजे. RCB कडे यंदा गेल्या १० वर्षातील सर्वोत्तम संघ आहे, त्यामुळे त्यांच्याविरूद्ध खेळायला मजा येईल. त्यावर उत्तर देताना रोहित शर्माने महत्त्वाचा मुद्दा सांगितला. “बंगळुरूचा संघ IPL चे विजेतेपद मिळवू शकेल की नाही ते माहीत नाही. पण एक गोष्ट खरी आहे की आम्हाला सर्वाधिक प्लॅनिंग हे बंगळुरूच्या फलंदाजांना बाद करण्यासाठीच करावं लागतं. त्यांच्याकडे धमाकेदार फलंदाज आहेत. त्यांच्या उणिवा शोधून त्यांना बाद करण्यासाठी आमची दोन-दोन तास टीम मीटिंग चालते. आतापर्यंत त्यांना विजेतेपद मिळालेलं नाही ही गोष्ट दुर्दैवी आहे, पण यंदा त्यांचा संघ समतोल वाटतो. साऱ्यांनीच चांगल्या खेळाडूंना संघात समाविष्ट करून घेतलं आहे. म्हणूनच मला यंदाच्या IPL ची ओढ लागली आहे”, असं रोहित म्हणाला.