21 October 2020

News Flash

‘मुंबई इंडियन्स’च्या खेळाडूचं करोनाग्रस्त क्रिकेटपटूबद्दल ट्विट, म्हणाला…

CSKचे दीपक चहर, ऋतुराज गायकवाड करोना पॉझिटिव्ह

IPL 2020साठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील एकूण १३ ते १४ जणांना करोनाची लागण झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर, नवखा खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि इतर काही कर्मचारी वर्ग यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दिपक चहरसह अन्य करोनाबाधितांना विलगीकरण कक्षात हलवण्यात आलं असून त्यांना आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण करुन, करोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल घेऊनच परत संघात दाखल होता येणार आहे.

दीपक चहरचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला त्याची बहिण मालती हिने धीर दिला आहे. तसेच, मुंबई इंडियन्सकडून खेळणारा त्याचा भाऊ राहुल चहर यानेही त्याच्यासाठी खास संदेश दिला. “भावा, खंबीर राहा. तुझ्या जलद तंदुरूस्तीसाठी आम्ही सारेच प्रार्थना करतो आहोत. आमच्या सदिच्छा तुझ्यासोबत आहेत. लवकर बरा हो”, असे ट्विट त्याने केले.

दीपक चहरच्या बहिणीनेदेखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दीपकचा एक फोटो शेअर करत त्याला संदेश दिला. “तू एक सच्चा लढवैय्या आहेस. तू जन्मापासून लढाऊ वृत्तीचा आहेस. अंधाऱ्या रात्रीनंतरचा दिवस हा कायमच जीवन प्रकाशमान करतो. तू देखील या आजारातून दुप्पट जोमाने पुनरागमन करशील याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा चेन्नई सुपर किंग्जच्या सिंहाची गर्जना ऐकण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक आहोत”, असे तिने ट्विट केले.

दरम्यान, १९ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेला कोणताही धोका नसल्याचं BCCIमधील सूत्रांनी सांगितलं असलं तरीही या कारणामुळे स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सध्या तरी स्पर्धेला कोणताही धोका नाही. पण सध्या घडत असलेल्या घडामोडींमुळे वेळापत्रकाची घोषणा काही काळ उशिराने करण्यात येईल”, अशी माहिती BCCIमधील सूत्रांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 4:48 pm

Web Title: mumbai indians spinner rahul chahar prays for csk deepak chahar speedy recovery from covid 19 vjb 91
Next Stories
1 CSKच्या करोनाग्रस्त क्रिकेटपटूला खास संदेश
2 VIDEO : पोलार्डचा दणका! ९ षटकारांसह ठोकल्या ७२ धावा
3 पुरस्कारांच्या खैरातीचे क्रीडामंत्र्यांकडून समर्थन
Just Now!
X