28 January 2021

News Flash

IPL 2019: पुणेरी ढोलच्या तालात मुंबई इंडियन्सची जंगी मिरवणूक, चाहत्यांची तुफान गर्दी

ओपन बसमधून मुंबई इंडियन्सची विजयी मिरवणूक काढण्यात आली

शेवटच्या चेंडूपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात मुंबईने चेन्नईला एका धावेने पराभूत करत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. हातातून सामना निसटणार अशी परिस्थिती असतानाही मुंबईने पुनरागमन करत चेन्नईचा पराभव केला. दरम्यान मुंबई इंडियन्सच्या विजयी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं असून त्याला सुरुवात झाली. विशेष म्हणजे यावेळी पुणेरी ढोलाच्या तालात मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.

ओपन बसमधून मुंबई इंडियन्सची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबई इंडियन्स संघाचे मालक मुकेश अंबानी यांचं घर अँटिलिया येथून मिरवणुकीला सुरुवात झाली असून ट्रायडंट हॉटेलपर्यंत ही मिरवणूक चालणार आहे. विजेत्या संघाला पाहण्यासाठी रस्त्यावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

ही मिरवणूक जसलोक हॉस्पिटल ते मरीन ड्राईव्ह येथून ट्रायडंट हॉटेलच्या दिशेने येणार आहे. यानंतर रात्री अँटिलिया येथे पार्टीचे आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विजयी संघातील खेळाडूंसहित सेलिब्रेटीही उपस्थित असतील.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला एका चेंडूंत २ धावा हव्या होत्या. पण अनुभवी लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर गडी बाद केला आणि मुंबईला विजेतेपद मिळवून दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2019 9:18 pm

Web Title: mumbai indians winning lap from anitilia to hotel trident
टॅग IPL 2019
Next Stories
1 IPL 2019: पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळणार का ? धोनी म्हणतो…
2 IPL 2019: याआधी धोनीला कधीच इतकं उदास पाहिलं नव्हतं – संजय मांजरेकर
3 IPL 2019: ट्रॉफी मिळाल्यावर काय करायची टोपी – महेला जयवर्धने
Just Now!
X