IPL २०१९ ला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई आणि विराट कोहलीच्या बंगळुरू संघात होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्सचा संघ हैदराबादच्या संघाशी भिडणार आहे. या स्पर्धेतील IPL २०१९ चा पहिला टप्पा जाहीर करण्यात आला असून त्यातील मुंबईचे २ सामने घरच्या मैदानावर आणि २ सामने प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर आहेत. त्यातील घरच्या मैदानावर होणाऱ्या मुंबईच्या सामन्यांसाठी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा मुंबई इंडियन्सचा स्पोर्ट स्टाफमधील सहकारी झहीर खान याने मराठी भाषेतून चाहत्यांना सामने पाहण्यासाठी मैदानावर येण्याचे आवाहन केले आहे.

झहीर खान याला मुंबई इंडियन्स संघाच्या Director of Cricket Operations (कार्यकारी संचालक) पदी नियुक्त करण्यात आले आहे. मुंबई इंडियन्स संघाने ट्विटरवर याबाबत Video पोस्ट केला होता.

२४ मार्चला पहिला सामना हैदराबादशी वानखेडे मैदानावर होणार आहे. मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी तब्बल १८ खेळाडूंना संघात कायम राखलं आहे. याचसोबत १० खेळाडूंना मुंबई इंडियन्सने करारमुक्त केले आहे. करारमुक्त केलेल्या खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा जे.पी.ड्युमिनी, ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांचा समावेश आहे. पॅट कमिन्स मागच्या हंगामात दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. याआधी मुंबई इंडियन्सने अकिला धनंजया आणि मुस्तफिजूर रेहमान यांना करारमुक्त केलं आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ

कायम राखलेले खेळाडू – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, एविन लुईस, कायरन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, अॅडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ</p>

आदलाबदल केलेले खेळाडू – डी कॉकला RCB मधून घेतले.

खरेदी केलेले – युवराज सिंह (एक कोटी), लसिथ मलिंगा (2 कोटी), अनमोलप्रीत सिंह (80 लाख), बरिंदर सरन( 3 कोटी 40 लाख) , पंकज जसवाल (२० लाख) ,राशिख सलाम (२० लाख)