गुलाबी थंडीत पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये टांझानियाच्या अल्फोन्स सिम्बूने बाजी मारली आहे. ४२ किलोमीटरचे अंतर सिम्बूने २ तास ९ मिनिटे २३ सेकंदांमध्ये पूर्ण केले आहे. या स्पर्धेत पूर्ण मॅरेथॉनमध्ये भारतीय गटात खेता रामने बाजी मारली. खेता रामने २ तास १९ मिनिट ५१ सेकंदांमध्ये मॅरेथॉन पूर्ण केली.
रविवारी गुलाबी थंडीत मुंबई मॅरेथॉन पार पडली. या मॅरेथॉनमध्ये सेलिब्रिटींची उपस्थिती लक्षणीय होती. अभिनेता जॉन अब्राहम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांची पत्नी अमृता यादेखील उपस्थित होत्या. विविध सामाजिक संदेश घेऊन अनेक जण या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. भारतीय महिला गटात परभणीमधील ज्योती गावतेने बाजी मारत महाराष्ट्राचा झेंडा रोवला आहे.

मॅरेथॉनमधील विजेत्यांची यादी
फूल मॅरेथॉन (४२ किलोमीटर, आंतरराष्ट्रीय पुरुष गट)

१. अल्फोन्स सिंबू – टांझानिया (वेळ – २ तास ०९ मि. ३२ सेकंद)
२. जोशूआ किप्कोटिल – केनिया (वेळ – २ तास ०९ मि. ५० सेकंद)
३. एलिऊड बार्नेग्टूनी – केनिया (वेळ – २ तास १० मि. ३० सेकंद)

फूल मॅरेथॉन (आंतरराष्ट्रीय महिला गट)
१. बोर्नेस किट्टूर – केनिया (वेळ – २ तास २९ मि. ०२ सेकंद)
२. चॅल्टू टाफा – इथोपिया (वेळ – २ तास ३३ मि. ०३ सेकंद)
३. टिगिस्ट गिर्मा – इथोपिया (वेळ – २ तास ३३ मि. १९ सेकंद)

फूल मॅरेथॉन (भारतीय पुरुष गट)
१. खेता राम (वेळ २ तास १९ मि. ५१ सेकंद)
२. बहादूर सिंह धोनी (वेळ – २ तास १९ मि. ५७ सेकंद)
३. टी एच संजिन लूवांग (वेळ – २ तास २१ मि. १९ सेकंद)

फूल मॅरेथॉन (भारतीय महिला गट)
१. ज्योती गावते (वेळ – २ तास ५० मि. ५३ सेकंद)
२. श्यामली सिंह (वेळ – ३ तास ८ मि. ४१ सेकंद)
३. जिग्मेत डोल्मा (वेळ – ३ तास १४ मि. ३८ सेकंद)

हाफ मॅरेथॉन (पुरुष गट)
१. लक्ष्मणन जी ( वेळ – १ तास ०५ मि. ०५ सेकंद)
२. सचिन पाटील (वेळ – १ तास ०६ मि. २२ सेकंद)
३. दिपक कुंभार (वेळ – १ तास ६ मि. २८ सेकंद)

हाफ मॅरेथॉन (महिला गट)
१. मोनिका आथरे (वेळ – १ तास १९ मि. १३ सेकंद)
२. मिनाक्षी पाटील (वेळ – १ तास २० मि. ५३ सेकंद)
३. अनुराधा सिंह (वेळ – १ तास २५ मि. २० सेकंद)