News Flash

Mumbai Marathon 2020 : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

जवळपास ५५,३२२ धावपटू सहभागी

प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. तर वरळी येथून  हाफ मॅरेथॉनची सुरूवात झाली आहे. यंदा मुंबई मॅरेथॉनचे हे १७वे पर्व आहे. एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर  बक्षिस रक्कम असून या स्पर्धेत मुख्य स्पर्धेतील तीन परदेशी धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार डॉलर , २५ हजार डॉलर आणि १७ हजार डॉलर रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर भारतीय स्पर्धकांना  ५  लाख ,४ लाख ,३ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे.

मुंबई मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही या स्पर्धेत भाग घेतला आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये जवळपास ५५,३२२ धावपटू सहभागी झाले आहेत. ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९,६६० धावपटू, २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १५,२६० तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या ‘ड्रीम रन’मध्ये १९,७०७ स्पर्धक, १० किमी शर्यतीत ८,०३२, वरिष्ठांच्या मॅरेथॉनमध्ये १,०२२ आणि अपंगांच्या शर्यतीत १,५९६ धावपटू सहभागी होणार आहेत.

 

गतवर्षीचे विजेते केनियाचा कॉसमस लगट आणि इथिओपियाची वर्कनेश अलेमू यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेल्या वर्षी या दोघांनी मुंबई मॅरेथॉनमधील सर्वात वेगवान वेळेची नोंद केली होती.

भारतीयांमध्ये सेनादलाच्या श्रीनू बुगाथा आणि ऑलिम्पियन सुधा सिंग यांनी मुंबई मॅरेथॉनद्वारे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील आपली जागा निश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्धमॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळे आणि मोनिका आथरे तसेच स्वाती गाढवे विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक आहेत.

टाटा मुंबई मॅरेथॉन’ स्पर्धेसाठी मुंबई महापालिकेसह सर्व प्रशासकीय व पोलीस यंत्रणाही सज्ज असून स्पर्धकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेसाठी विविध वाहतूक बदल आणि अतिरिक्त रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या आहेत.

इतर सुविधा

अ‍ॅम्ब्युलन्स (११), वैद्यकीय सेवक (६००), वैद्यकीय केंद्रे (१२), पाणी मिळण्याची केंद्रे (२७), कूल स्पंज केंद्रे (११), स्वयंसेवक (२,५००), तैनात पोलीस (९,०००)

एकूण सात स्पर्धा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

पूर्ण मॅरेथॉन- पहाटे ५.१५

१० किलोमीटर-स. ६.२०

एलिट स्पर्धा -स. ७.२०

अपंगांसाठी स्पर्धा – स. ७.२५

ज्येष्ठ नागरिक – स. ७.४५

ड्रीम रन – स. ८.०५

वरळी डेअरी

अर्ध मॅरेथॉन-पहाटे ५.१५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2020 6:31 am

Web Title: mumbai marathon 2020 17th mumbai marathon opening abn 97
Next Stories
1 Ind vs Aus : आज बेंगळूरुत सत्तासंघर्ष!
2 हार्दिकसाठी निवड समितीची बैठक लांबणीवर
3 निवड समितीच्या रिक्त जागांसाठी ‘बीसीसीआय’कडून अर्ज मागवले
Just Now!
X