प्रत्येक वर्षाच्या तिसऱ्या रविवारी होणारी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा नेहमीप्रमाणेच यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. मुंबई मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील अव्वल धावपटूंसह हौशी स्पर्धकांनीही भाग घेतला होता.

या स्पर्धेत जवळपास ५५ हजार ३२२ धावपटू सहभागी झाले होते. यातील ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९ हजार ६६० धावपटू, २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १५ हजार २६० तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या ‘ड्रीम रन’मध्ये १९ हजार ७०७ स्पर्धक, १० किमी शर्यतीत ८ हजार ३२, वरिष्ठांच्या मॅरेथॉनमध्ये १ हजार २२ आणि अपंगांच्या शर्यतीत १ हजार ५९६ धावपटू सहभागी झाले होते.

आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत इथिओपिअन धावपटूंनी बाजी मारली. पुरुष गटातील पहिले तिनही क्रमांक इथिओपिअन खेळाडूंनी पटकावले. तसेच महिला गटातील पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर इथिओपिअन महिलांनी आपले नाव कोरले. मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार डॉलर, २५ हजार डॉलर आणि १७ हजार अमेरिकी डॉलर्सचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच पहिल्या तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे पाच लाख, चार लाख आणि तीन लाख रुपये बक्षिस स्वरुपात देण्यात आले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++