News Flash

लसीकरण होईपर्यंत जैव-सुरक्षा अनिवार्य!

जोवर लसीकरण होत नाही, तोवर जैव-सुरक्षित वातावरण हीच क्रिकेटची जीवनशैली आहे.

लसीकरण होईपर्यंत जैव-सुरक्षा अनिवार्य!

आठवडय़ाची मुलाखत सलील अंकोला, मुंबईचा निवड समिती अध्यक्ष

विशेष क्रीडा प्रतिनिधी, लोकसत्ता

मुंबई : जोवर लसीकरण होत नाही, तोवर जैव-सुरक्षित वातावरण हीच क्रिकेटची जीवनशैली आहे. ती खेळाडूंना स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोलाने व्यक्त केली.

* मुंबईच्या क्रिकेट संघाचे महत्त्वाचे अनुक्रमे मुख्य प्रशिक्षक आणि निवड समितीचे प्रमुख हे तुम्हाला लाभले आहे, या जबाबदारीकडे कशा रीतीने पाहता?

दुखापतीमुळे माझी क्रिकेट कारकीर्द लवकर संपुष्टात आली, पण गेली पाच वष्रे क्रिकेटच्या प्रवाहात पुन्हा सक्रिय होण्याची माझी इच्छा होती. वर्षभरापूर्वी मी निवड समितीसाठी इच्छुक असल्याचे संघटनेला कळवले होते. क्रिकेट सोडून बरीच वष्रे झाली असली तरी नियमित खेळाशी संपर्कात आहे. कोण जिंकले आहे, कोणता खेळाडू काय करीत आहे, याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. मुंबईच्या क्रिकेटसाठी काही पयार्याचा मी गांभीर्याने विचार करीत होतो. यापैकी निवड समितीचे अध्यक्षपद मिळाले, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजतो.

* सर्वात पहिले आव्हान तुमच्यापुढे सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे आहे, याकडे तुम्ही कसे पाहता?

करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर मुश्ताक अली स्पध्रेची घोषणा आणि त्यानंतर संघनिवड या घटना वेगाने घडत आहेत. त्यामुळे ‘एमसीए’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वोत्तम संघनिवड आम्ही करू. अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात करोनाची साथ मोठय़ा प्रमाणात होती. त्यामुळे संघनिवडीत आपण पिछाडीवर आहोत. आता राज्य शासनाने सरावालाही परवानगी दिली आहे.

मुंबईला घरच्या मैदानावर साखळी सामने खेळता येणार आहेत, याविषयी काय सांगाल?

‘बीसीसीआय’नेच सहा केंद्रांपैकी एक म्हणून मुंबईची निवड स्पध्रेच्या सामन्यांसाठी केली आहे. घरच्या वातावरणाचा आणि खेळपट्टय़ांचा फायदा मुंबईला नक्कीच मिळेल.

* आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही जैव-सुरक्षित वातावरणाचे आव्हान क्रिकेटपटूंपुढे असेल, याविषयी तुमचे मत काय आहे?

करोना साथीच्या कालखंडात क्रिकेट चालू ठेवण्याचा हा सुरक्षित मार्ग आहे. त्यामुळे खेळाडूंना क्रिकेटकडे पूर्णत: लक्ष केंद्रित करता येते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आणि ‘आयपीएल’चे सामने अशाच पद्धतीने झाले. जोवर लसीकरण होत नाही, तोवर हीच क्रिकेटची जीवनशैली असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2020 12:10 am

Web Title: mumbai selection committee chairman salil ankola interview fo loksatta zws 70
Next Stories
1 कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही!
2 ला-लीगा फुटबॉल : पेले यांच्या ६४३ गोलच्या विक्रमाशी मेसीची बरोबरी
3 विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा : सिम्रनजीत, मनीषाचे सुवर्णयश!
Just Now!
X