News Flash

श्रेयस अय्यरचा निर्णय १० फेब्रुवारीला

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा सहा शहरांमध्ये २० फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान खेळवण्याचा निर्णय

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या उपलब्धतेच्या निर्णयासाठी मुंबईला १० फेब्रुवारीपर्यंत थांबावं लागणार आहे. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा २० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.

खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळू शकला नव्हता. ‘राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सध्या पुनर्वसनाची प्रक्रिया चालू असून, १० तारखेपर्यंत तंदुरुस्तीबाबत स्पष्टता येऊ शकेल, असे श्रेयसने कळवलं आहे,’अशी माहिती मुंबई क्रिकेट संघटनेच्या सुत्रांनी दिली.

विजय हजारे स्पर्धा १५ फेब्रुवारीपासून –

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा सहा शहरांमध्ये २० फेब्रुवारी ते १४ मार्चदरम्यान खेळवण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. सर्व संघ १३ फेब्रुवारीला जैव-सुरक्षित वातावरणात दाखल झाल्यानंतर त्यांच्या तीन वेळा करोना चाचणी घेण्यात येणार आहेत.

असं आहे स्पर्धेचं वेळापत्रक –

‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी शनिवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. सुरत, इंदूर, बेंगळूरु, कोलकाता आणि  जयपूर या ठिकाणे पाच गटांचे सामने निश्चित करण्यात आले आहेत. तसेच प्लेट गटातील आठ संघ आपापले सामने तामिळनाडूतील विविध मैदानांवर खेळतील. ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार, खेळाडूंना स्पर्धेआधी तीन तसेच बाद फेरीला सुरुवात होण्याआधी तीन वेळा करोना चाचणी करावी लागणार आहे.

अ’ गट (सुरत) :  गुजरात, गोवा, चंडीगढ, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदा

‘ब’ गट (इंदूर) : तामिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश

‘क’ गट (बेंगळूरु) : कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओदिशा, रेल्वे, बिहार

‘ड’ गट (जयपूर) : दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पुद्दुचेरी

‘ई’ गट (कोलकाता)  : बंगाल, सेनादल, जम्मू आणि काश्मीर, सौराष्ट्र, हरयाणा

प्लेट गट (तामिळनाडू) : आसाम,   उत्तराखंड, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 9:01 am

Web Title: mumbai to know about shreyas iyers availability on february 10 nck 90
Next Stories
1 हजारे क्रिकेट स्पर्धा २० फेब्रुवारीपासून
2 राष्ट्रीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा : राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
3 अनुभवी शिलेदारांपुढे तेजांकितांची अग्निपरीक्षा!
Just Now!
X