27 September 2020

News Flash

मुंबईची हाराकिरी

सूर्यकुमार यादवची १७ चौकारांसह ९९ धावांची खेळी हे मुंबईच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले.

कुलदीप-सौरभ प्रभावी; सूर्यकुमारचे शतक हुकले

कुलदीप यादव आणि सौरभ कुमार या उत्तर प्रदेशच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांपुढे मुंबईने अक्षरश: हाराकिरी पत्करली. त्यामुळे म्हैसूरला सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात मुंबईचा डाव २३३ धावांत कोसळला. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर उत्तर प्रदेशने १ बाद २२ धावा केल्या. सूर्यकुमार यादवची १७ चौकारांसह ९९ धावांची खेळी हे मुंबईच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले.

मुंबईने नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईकडून सूर्यकुमारने सर्वाधिक धावा केल्या. शतकापासून एका धावेच्या अंतरावर असताना शिवम चौधरीने त्याला पायचीत केले. श्रेयस अय्यर (३५), आदित्य धुमाळ (३०) आणि कर्णधार आदित्य तरे (३०) यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

संक्षिप्त धावफलक

  • मुंबई (पहिला डाव) : ७५.२ षटकांत सर्व बाद २३३ (सूर्यकुमार यादव ९९, श्रेयस अय्यर ३५; कुलदीप यादव ४/४६, सौरभ कुमार ३/५३)
  • उत्तर प्रदेश (पहिला डाव) : १२ षटकांत १ बाद २२.

विदर्भचा ५९ धावांत खुर्दा; संकलेचाचे सात बळी

महाराष्ट्राच्या अनुपम संकलेचाने सात बळी घेत विदर्भचा पहिला डाव केवळ ५९ धावांमध्ये गुंडाळला व रणजी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी आपल्या संघाचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याच्या कामगिरीच्या पाठोपाठ नौशाद शेखने नाबाद शतक झळकावले. त्यामुळे महाराष्ट्राने दिवसअखेर पहिल्या डावात ३ बाद २४० असे खणखणीत उत्तर दिले. द्रुतगती गोलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टी व वातावरणाचा फायदा महाराष्ट्राच्या गोलंदाजांना सकाळच्या सत्रात मिळाला. संकलेचा (७/२५) व प्रदीप दाढे (२/११) यांच्या प्रभावी माऱ्यापुढे विदर्भच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. विदर्भकडून शलभ श्रीवास्तव (१९) हा एकटाच दोन आकडी धावा करू शकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2016 12:42 am

Web Title: mumbai uttar pradesh cricket match
Next Stories
1 Cricket Score of India vs England : राजकोटी कसोटी अनिर्णीत, कोहलीच्या नाबाद ४९ धावा
2 रविवार विशेष : शिखर भूषण
3 पहिल्या डावात गतविजेत्या कार्लसनचे डावपेच फसले
Just Now!
X