News Flash

मुंबई सिटीची विजयी हॅट्ट्रिक

या विजयासह मुंबईने गुणतालिकेत सहाव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.

सुनील छेत्रीचा नेत्रदीपक खेळ

मुंबई सिटी एफसी क्लबने इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) बुधवारी नॉर्थ ईस्ट युनायटेडचा ५-१ असा दारुण पराभव करत विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा सुनील छेत्री नामक वादळ घोंगावले. छेत्रीने तीन गोल करून नॉर्थ ईस्टचा बचाव निष्प्रभ केला. त्याला सोनी नॉर्डे आणि फ्रांत्ज बेर्टिन यांनी प्रत्येकी एक गोल करून चांगली साथ दिली.

या विजयासह मुंबईने गुणतालिकेत सहाव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. मुंबईच्या खात्यात सहा सामन्यांत तीन विजयांसह १० गुण जमा झाले आहेत.

दोन्ही क्लब सलग दोन विजयांसह या लढतीत उतरले होते. मात्र, घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा मुंबईला असल्यामुळे त्यांचे पारडे जड होते.  २५व्या मिनिटाला छेत्रीने पेनल्टीवर मुंबईसाठी पहिला गोल करून केला. मात्र, अवघ्या चार मिनिटांत नॉर्थ ईस्टकडून बोईथांगने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर ४०व्या मिनिटाला नॉर्डेच्या पासवर छेत्रीने अचूक गोल करत मुंबईला  २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत मुंबईने  ही आघाडी कायम राखली.

४८व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टीवर गोल करून छेत्रीने सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवत मुंबईची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. त्यानंतर ५१व्या मिनिटाला नॉर्डेने, तर ८७ व्या मिनिटाला बेर्टिनने गोल करून मुंबईचा ५-१ असा विजय निश्चित केला.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 1:46 am

Web Title: mumbai win indian super league
टॅग : Indian Super League
Next Stories
1 युकीचे आव्हान कायम
2 डी’व्हिलियर्स सध्याचा आघाडीचा फलंदाज- सचिन तेंडुलकर
3 BLOG : पेंन्शनर गोलंदाज आणि शास्त्रीबुवांचा त्रागा!
Just Now!
X