शनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय)च्या कोर्टवर मुंबईकरांना अव्वल टेबल टेनिसपटूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. कारण १६ ते २० ऑक्टोबर या कालावधीत ज्युनिअर आणि कॅडेट गटासाठी प्रतिष्ठेची रिलायन्स इंडिया खुली टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा रंगणार आहे. या स्पध्रेत बलाढय़ चीनसहित भारत, हाँगकाँग, इराण, संयुक्त अरब अमिराती आणि नायजेरिया असे सहा संघ सहभागी होणार आहेत. या स्पध्रेत मुले आणि मुलींच्या एकंदर १२ गटांचा समावेश आहे.
‘‘मुंबईत आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पध्रेचे स्वप्न मी बरीच वष्रे जोपासले होते. या स्पध्रेच्या यजमानपदाच्या निमित्ताने माझे स्वप्न प्रत्यक्षात साकारते आहे,’’ असे मत भारताचे प्रशिक्षक आणि स्पध्रेचे संचालक कमलेश मेहता यांनी सांगितले. या आधी १९५२मध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर विश्व अजिंक्यपद स्पर्धा झाली होती, तर १९८३मध्ये खार जिमखान्यावर राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा झाली होती. मुलांच्या ज्युनिअर गटात अभिषेक यादव, उत्कर्ष गुप्ता, निशाद शाह, चिन्मय दातार, तर कॅडेट गटात मुदित दाणी, शैर्य पेडणेकर, अनिरुद्ध घोष तसेच मुलींच्या ज्युनिअर गटात रीथ टेनिसन, अहिका मुखर्जी, मल्लिका भांडारकर या खेळाडूंचा सहभाग असेल.