News Flash

मजूराच्या मुलीने मोडला चालण्याचा विक्रम

सुवर्णपदकाची कमाई

मुंबईमध्ये बांधकामावर मजुराचं काम करणाऱ्याच्या मुलीनं चालण्याचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. मुळची उत्तर प्रदेशमधील असणारी मुनिता प्रजापती हिनं २० वर्षाखालील महिलांच्या १० हजार मीटर चालण्याची स्पर्धा जिंकत राष्ट्रीय विक्रम केला आहे. ३६ व्या राष्ट्रीय ज्यूनिअर एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

मुनिता प्रजापती हिनं ४७ मिनिट ५४ सेकंदात दहा हजार मीटर चालण्याचा पराक्रम केला. प्रजापतीनं रेश्मा पटेल हिला (४८ मिनिट २५ सेकंद) हिला पराभवूत करत अव्वल स्थान पटाकवलं आहे. गेल्या महिन्यात वाराणसी येथे झालेल्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला होता. या स्पर्धेत पटेल हिला सुवर्णपदक मिळालं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 2:27 pm

Web Title: munita daughter of construction labourer breaks under 20 race walk record nck 90
Next Stories
1 ओए मेनन; कोहलीची अंपायरकडे केलेली तक्रार व्हायरल
2 IND vs ENG : पराभवानंतर विराट कोहलीचा इंग्लंडला इशारा, म्हणाला….
3 WTC फायनलमध्ये भारत कसा पोहचणार? चेन्नईतील पराभवानं बिघडलं गणित
Just Now!
X