आखीव-रेखीव आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंच्या मांदियाळीत रंगलेल्या ‘तळवळकर क्लासिक’ राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारली ती आशियाई विजेत्या मुरली कुमारने. तामिळनाडूचा राजेंद्रम एम. आणि नौदलाच्या मुरली कुमार यांच्यामध्ये चांगलीच चुरस रंगली. दोघांची शरीरयष्टी दांडगी असली तरी शरीर रेखीव न ठेवल्यामुळे राजेंद्रम स्पर्धेतून बाहेर पडला आणि तेच मुरलीच्या पथ्यावर पडले. नवी दिल्लीच्या संजीव झा याने स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शकाचा (बेस्ट पोझर) मान पटकावला.
मधुकर तळवळकर यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ‘मि. युनिव्हर्स’ ठरलेल्या १०२ वर्षांच्या मनोहर एच. यांनी विजेत्याला पारितोषिक देताना साऱ्यांचाच ऊर भरून आला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या चार शरीरसौष्ठवपटूंनी अव्वल दहांमध्ये बाजी मारली. या कार्यक्रमात मनोहर एच. आणि मधुकर तळवळकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्लाइड शो’ने साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केले.
स्पर्धेतील अव्वल १० खेळाडू पुढीलप्रमाणे :
१. मुरली कुमार (भारतीय नौदल), २. राजेंद्रम एम. (तामिळनाडू), ३. बॉबी सिंग (भारतीय रेल्वे), ४. विजय बहाद्दूर (उत्तर प्रदेश), ५. टी. सत्यनारायणन (भारतीय रेल्वे), ६. विक्रांत देसाई (महाराष्ट्र), ७. नीरज कुमार (दिल्ली), ८. सागर माळी (महाराष्ट्र), ९. सागर कातुर्डे (महाराष्ट्र), १०. बी. महेश्वरन (महाराष्ट्र)
सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक (बेस्ट पोझर) : संजीव झा (नवी दिल्ली).