20 January 2021

News Flash

देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ

मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धा आजपासून

| January 10, 2021 02:13 am

मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धा आजपासून

मुंबई : करोनाच्या विश्रांतीनंतर देशात प्रथमच महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेपासून देशांतर्गत क्रिकेट मोसमाला प्रारंभ होत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लिलावाआधी होणाऱ्या या स्पर्धेद्वारे खेळाडूंना चमक दाखवण्याचे व्यासपीठ मिळाले आहे.

शिखर धवन, सुरेश रैना आणि इशांत शर्मासारखे भारतीय संघातील चेहरे या स्पर्धेत खेळणार असून एस. श्रीशांतचे पुनरागमन ही भारतीय क्रिकेटशौकिनांसाठी खूप मोठी बाब असणार आहे. २०१३मध्ये ‘आयपीएल’मधील निकाल निश्चितीप्रकरणी श्रीशांतवर बंदी घालण्यात आली होती.

फेब्रुवारीत ‘आयपीएल’चा लिलाव होत असल्याने देशातील बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे सर्वाचे विशेष लक्ष असेल. त्याचबरोबर वर्षअखेरीस भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंची दुसरी फळी तयार ठेवण्याची जबाबदारी नव्या राष्ट्रीय निवड समितीसमोर असेल. ऋतुराज गायकवाड, प्रियम गर्ग, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सर्फराझ खान, आर. साईकिशोर आणि एम. सिद्धार्थ या नव्या चेहऱ्यांकडेही निवड समितीचे लक्ष असेल.

जैवसुरक्षा वातावरणात सहा वेगवेगळ्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 2:13 am

Web Title: mushtaq ali trophy t20 tournament start from today zws 70
Next Stories
1 जैव-सुरक्षेचा सोनेरी पिंजरा!
2 भारताला मोठा झटका, रविंद्र जाडेजा चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता
3 IND vs AUS: ऑस्ट्रेलियन कर्णधाराचा पंचांशी वाद; निर्णय न पटल्याने शिवीगाळ
Just Now!
X