आशिया चषकात आज भारत आणि बांगलादेश हे संघ अंतिम फेरीत समोरासमोर येणार आहेत. मश्रफी मोर्ताझाच्या संघाने Super 4 गटाच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानवर मात करुन अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. अंतिम सामन्यात भारताविरुद्ध होणाऱ्या लढतीबद्दल प्रश्न विचारला असता मश्रफी मोर्ताझाने, स्पर्धेतल्या पहिल्याच सामन्यात ज्यावेळी तमिम इक्बालने बोटाला दुखापत झालेली असतानाही संघासाठी मैदानावर येत एका हाताने फलंदाजी केली, तो क्षण माझ्यासाठी स्पर्धेचं विजेतेपद मिळवण्यासारखा होता असं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – Asia Cup Final 2018 : बांगलादेशला हलकं लेखण्याची चूक भारत करणार नाही – शिखर धवन

अंतिम सामन्यात बांगलादेशच्या संघात शाकीब अल हसन हा अष्टपैलू खेळाडू सहभागी होणार नाहीये. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात शाकीबच्या करंगळीला दुखापत झाली होती, त्यामुळे तो अंतिम सामना खेळू शकणार नाहीये. याचसोबत मश्रफी मोर्ताझा आणि मुशफिकूर रहिम हे खेळाडू देखील दुखापतग्रस्त असल्याचं समजतंय. Super 4 गटाच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : फायनलआधी बांगलादेशला मोठा धक्का; ‘हा’ अनुभवी खेळाडू स्पर्धेबाहेर

भारतीय संघ या स्पर्धेत विजयासाठी प्रबळ दावेदार आहे. सध्या ते जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहेत. याचसोबत आम्ही पहिल्या सामन्यानंतरच दुखापतीमुळे महत्वाच्या खेळाडूंना गमावत बसलो. त्यामुळे इतर संघाच्या तुलनेत भारतीय संघ हा सध्याच्या घडीला नक्कीच उजवा आहे. अंतिम सामन्यात भारताला हरवायचं असल्यास आम्हाला मानसिक दृष्ट्या कणखर होऊन मैदानावर उतरावं लागणार आहे. मात्र सर्व परिस्थितीवर मात करत आम्ही अंतिम फेरी गाठली आहे, त्यामुळे एक कर्णधार या नात्याने माझ्या खेळाडूंचा मला अभिमान असल्याचं मोर्तझा म्हणाला.

अवश्य वाचा – Asia Cup 2018 : ‘आशिया का किंग’ कौन? भारत-बांगलादेश आज अंतिम सामना