नेपाळहून भारतात दाखल झाल्यानंतर लष्करी सेवेचा भाग असलेल्या जितू रायने नेमबाजी खेळात अल्पावधीतच दमदार भरारी घेतली. पुढील वर्षी रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा तो पहिला नेमबाजपटू ठरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जितूला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मानसन्मान आणि प्रसिद्धीझोताने शांत स्वभावाचा जितू विचलित झालेला नाही. रिओ ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक मिळवण्याची प्रबळ इच्छा असल्याचे त्याने सांगितले. ऑलिम्पिक तयारीविषयी विचारले असता जितू म्हणाला, ‘ऑलिम्पिक पदकाची इच्छा प्रबळ आहे. दबाव, अपेक्षा यांचा मी जराही विचार करत नाही. मला देशासाठी पदक मिळवायचे आहे हेच उदिष्ट आहे. अनाठायी पुढता विचार करण्यापेक्षा मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतो.