25 November 2020

News Flash

रैनाच्या कायम पाठीशी आहे, वक्तव्याचा विपर्यास केला – एन.श्रीनीवासन

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातो हे दुर्दैवी !

आयपीएलच्या तेराव्या हंगामातून चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने माघार घेतली. खासगी कारण सांगत रैना भारतात परतला. रैनाने अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं. त्यातचं CSK चे सर्वेसर्वा आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनीवासन हे देखील रैनावर नाराज असल्याचं समोर आलं होतं. Outlook शी बोलत असताना रैनाच्या माघार घेण्याच्या निर्णयावर श्रीनीवासन यांनी नाराजी व्यक्ती केली होती.

काय म्हणाले होते श्रीनीवासन?? जाणून घ्या…

“रैनाचं असं तडकाफडकी माघार घेणं साऱ्यांसाठी धक्कादायक आहे, पण संघाचे खेळाडू या धक्क्यातून लवकरच सावरतील. यशस्वी झाल्यावर काही लोकांच्या डोक्यात खूपच हवा जाते, त्यातला हा प्रकार आहे. पण संघातील सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. धोनी सारं काही सांभाळून घेऊ शकतो. प्रत्येक क्रिकेटपटू हा आपल्या संघाचं नेतृत्व करत असतो. चेन्नईचा संघ हा एका कुटुंबाप्रमाणे आहे आणि संघातील ज्येष्ठ खेळाडूही एकमेकांशी जुळवून घेतलं आहे. अजून तरी IPLचा हंगाम सुरू झालेला नाही. पण लवकरच रैनाला समजेल की त्याने स्वत:चे किती मोठे आर्थिक नुकसान केले आहे.”

परंतू यानंतर टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत असताना श्रीनीवास यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं सांगितलं. “सुरेश रैनाचं चेन्नई संघासाठीचं योगदान हे महत्वाचं आहे. माझ्या वक्तव्यातून लोकं दुसरा अर्थ काढत आहेत हे दुर्दैवी आहे. सुरेश रैना सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे आपल्या सर्वांना समजायला हवं आणि त्याला सध्या मोकळीक देणं गरजेचं आहे. संघ म्हणून आमचा रैनाला नेहमी पाठींबा आहे, खडतर काळात आम्ही त्याच्या पाठीशी आहोत.” श्रीनीवासन यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

२००८ साली स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर मधल्या दोन वर्षांचा कालावधी वगळता (चेन्नई संघावर बंदी घालण्यात आलेली दोन वर्ष) सुरेश रैना हा चेन्नईच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. १९३ सामने खेळलेल्या रैनाच्या नावावर ५ हजारपेक्षा जास्त धावा जमा आहेत. यंदाच्या हंगामात आपला २०० वा आयपीएल सामना खेळण्याची संधी रैनाकडे होती. परंतू माघार घेतल्यामुळे त्याला पुढच्या हंगामापर्यंत वाट पहावी लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 7:15 pm

Web Title: my comment taken out of context will stand by suresh rains says n srinivasan psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 ‘ज्युनियर पांड्या’ झाला एका महिन्याचा; पाहा खास फोटो
2 Video : रैनाची माघार CSK ला महागात पडणार ??
3 शोएब अख्तर पाकिस्तानच्या संघावर भडकला, म्हणाला…
Just Now!
X