एम.सी मेरी कोमने आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. या स्पर्धेतील पाचवे पदक तिच्यासाठी खूपच खास आहे. कारण एक वर्षानंतर तिने रिंगमध्ये दमदार पुनरागमन केलय. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत पाचव्यांदा सुवर्ण पटकावून मेरी कोमने बॉक्सिंगच्या रिंगमध्ये नवा इतिहास रचला. या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्ण पदक मिळवण्याचा पराक्रम तिने केला. या स्पर्धेतील यशानंतर तिने कारकिर्दीतील प्रत्येक पदक खास असल्याची प्रतिक्रिया दिली.

ऐतिहासिक विजयानंतर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मेरी कोम म्हणाली की, आशियाई स्पर्धेत मिळालेले पदक खास आहे. आतापर्यंत कारकिर्दीत मिळवलेल्या पदकांसाठी संघर्ष करावा लागला आहे. प्रत्येक पदकामागे संघर्षाची एक वेगळी कहाणी दडलेली आहे. शिवाय खासदार असताना मिळालेलं सुवर्ण पदक अधिक खास वाटते. यामुळे उंची अधिक वाढेल, असा विश्वासही मेरी कोमने व्यक्त केला.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

बॉक्सिंगच्या रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला हतबल करणारी मेरी कोम राज्यसभा सदस्य आणि भारतीय बॉक्सिंग संघाचे परीक्षक म्हणून देखील सक्रिय आहे. याशिवाय मेरी कोम तीन मुलांची आई आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी मेरी कोमने आपल्यातील बॉक्सिंगचे कसब दाखवून देत पाचव्यांदा आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. वेगवेगळ्या भूमिका सक्षमपणे पेलणारी मेरी कोम म्हणाली की, राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यापासून नियमित संसदेत जाते. सरकारी परीक्षक असल्याने भारतीय बॉक्सिंग संघाच्या नियमित होणाऱ्या बैठकीलाही उपस्थित रहावे लागते. हे सर्व सांभाळून सराव केला. अनेक भूमिका सांभाळत यश मिळवणे किती कठीण असते, हे लोक समजू शकतील. मी एक आई आहे. त्यामुळे तिन्ही मुलांच्या संगोपनाकडे लक्ष द्यावे लागते. अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी हवे असणारे बळ माझ्यात नक्की कोठून येत, हे अद्याप समजू शकलेलं नाही, असेही ती म्हणाली.