News Flash

रोहित शर्मा माझ्यासाठी आदर्श, नवोदीत पाकिस्तानी खेळाडूची ‘हिटमॅन’वर स्तुतीसुमनं

रोहितसारखं खेळण्याचा माझा प्रयत्न असतो

मुंबईकर रोहित शर्माने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने भारतीय संघात आपलं स्थान पक्क केलं आहे. काही महिन्यांपूर्वी फक्त मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या रोहितला कसोटी क्रिकेटमध्येही सलामीला येण्याची संधी मिळाली. रोहितने या संधीचं सोनं करताना, खोऱ्याने धावा काढत सलामीच्या जागेवर आपली दावेदारी सांगितली. रोहित शर्माच्या या खेळावर पाकिस्तानचा युवा फलंदाज हैदर अली चांगलाच प्रभावित झाला आहे. एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हैदरने रोहित शर्मा माझ्यासाठी आदर्श असल्याचं म्हटलं आहे.

“रोहितच्या फलंदाजीतला स्ट्राईक रेट मला सर्वात जास्त आवडतो. त्याच्यासारखा खेळ मला जमायला हवा यासाठी मी प्रयत्न करत असतो. माझ्यासाठी तो आदर्श आहे.” पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेत हैदरने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. ९ सामन्यांध्ये हैदरने २३९ धावा केल्या. यानंतर करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेचे सामने अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. पेशावर झल्मी संघाकडून खेळणाऱ्या हैदरचं अनेक माजी खेळाडूंनी कौतुकही केलं.

दरम्यान, करोनाचा फटका बीसीसीआयलाही बसला आहे. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत परदेशातील नागरिकांना भारतात येण्यासाठी बंदी केली होती. आयपीएलचा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ३ हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान होण्याचा अंदाज आहे. याचसोबत सर्व संघमालकांनाही १०० कोटींपेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागू शकतं. याचसोबत स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंनाही फटका बसणार आहे. त्यामुळे आगामी काळात बीसीसीआय आयपीएलबद्दल काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 7:13 pm

Web Title: my idol is rohit sharma pakistans rising talent wants to bat like india opener psd 91
Next Stories
1 करोनाशी लढा : हॉकी इंडियाची पंतप्रधान सहायता निधीला २५ लाखांची मदत
2 करोनाविरोधात ‘दादा’गिरी, गरजू व्यक्तींसाठी सौरव गांगुलीने दिले २ हजार किलो तांदूळ
3 देशावर करोनाचं संकट, मात्र राजस्थान रॉयल्सचे अधिकारी आयपीएलसाठी उत्सुक
Just Now!
X