14 July 2020

News Flash

रोहितच्या तिसऱ्या द्विशतकादरम्यान पत्नी झाली होती भावूक, कारण…

श्रीलंकेविरुद्ध मोहालीच्या मैदानात झळकावलं होतं द्विशतक

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईकर रोहित शर्माने भारतीय संघातली आपली जागा पक्की केली आहे. वन-डे आणि टी-२० संघाचा उप-कर्णधार असलेल्या रोहितने आतापर्यंत अनेक विक्रम मोडले आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं झळकावण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर जमा आहे. रोहितने आपलं तिसरं द्विशतक मोहालीच्या मैदानावर डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झळकावलं. या सामन्यात रोहितने १५३ चेंडूत २०८ धावा केल्या. BCCI च्या Open Nets with Mayank या कार्यक्रमात मयांक अग्रवाल आणि आपला सहकारी शिखर धवनसोबत गप्पा मारताना रोहितने आपल्या पत्नीचा एक किस्सा सांगितला.

“मी ज्यावेळी तिससं द्विशतक झळकावलं त्यावेळी माझी बायको खूप भावूक झाली होती. त्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आतापर्यंत मी तिला दिलेलं ते सर्वोत्तम गिफ्ट होतं. १९६ वर खेळत असताना धाव घेताना मला उडी मारावी लागली होती, त्यावेळी तिला वाटलं माझ्या दंडाला काही दुखापत झाली आहे.” रोहितने आपली आठवण सांगितली.

रोहितने या सामन्यात १३ चौकार आणि १२ षटकारांसह २०८ धावा केल्या होत्या. भारताने या सामन्यात ४ गड्यांच्या मोबदल्यात ३२९ धावांपर्यंत मजल मारली होती. श्रीलंकेच्या फलंदाजांना हे आव्हान झेपलं नाही, अखेरीस भारताने १४१ धावांनी या सामन्यात विजय मिळवला. खरंतर या सामन्यात मी द्विशतक झळकावू शकेन असं मला वाटलं नव्हतं. पण मी १२५ धावांचा टप्पा मार केला आणि मला आत्मविश्वास आला आणि त्यानंतर मी आक्रमक खेळत गेल्याचंही रोहितने यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 4:05 pm

Web Title: my wife cried as she thought i twisted my arm says rohit sharma reminisces third double ton psd 91
Next Stories
1 राहुल द्रविडने उधळली विराटवर स्तुतीसुमनं, म्हणाला…
2 सरदार पहली बार नमाज पढने आया है, अब अल्लाह उनकी पहली सुनेगा !
3 “…पर मारना तो पडेगा”; पियुष चावलाने सांगितला धोनीबद्दलचा भन्नाट किस्सा
Just Now!
X