बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी नवनियुक्त केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. बैठकीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला तरी बीसीसीआयचे महत्त्वपूर्ण पदाधिकारी असलेल्या जेटली यांच्यासह श्रीनिवासन यांनी अर्धा तास चर्चा केली. बैठकीबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास श्रीनिवासन यांनी नकार दिला.
भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेळ देण्यासाठी जेटली यांनी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा त्याग केला होता. मात्र असे असले तरी अजूनही जेटली यांची बीसीसीआयमधील भूमिका निर्णायक आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी होते. बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीचे जेटली प्रमुख आहेत. या समितीनेच श्रीसंत, अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील सहभागप्रकरणी आजीवन बंदीची शिक्षा ठोठावली होती.