22 March 2019

News Flash

नदाल टोरांटो मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत

पहिला सेट संपण्याच्या स्थितीत असताना खेळात पावसाचा व्यत्यय आला.

स्पेनच्या राफेल नदाल

टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धा

टोरांटो : टोरांटो मास्टर्स टेनिस स्पर्धेमध्ये स्पेनच्या राफेल नदालने स्वित्र्झलडच्या स्टॅन वाविरकाला सलग दोन सेटमध्ये ७-५, ७-६ असे पराभूत केले. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊनदेखील नदालचा धडाका कायम राहिल्याने सामना दोनच सेटमध्ये संपुष्टात आला.

पहिला सेट संपण्याच्या स्थितीत असताना खेळात पावसाचा व्यत्यय आला. मात्र नदालने तीच लय कायम राखत पहिला सेट खिशात घातला. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये प्रचंड चुरस दिसून आली. त्यात वाविरकाने २-१ अशी बढतदेखील घेतली. मात्र त्यानंतर नदालने पुन्हा बरोबरी साधत नदालने सामना जिंकला.या सामन्यानंतर बोलताना नदालने मी अत्यंत सकारात्मक खेळ केल्यानेच जिंकल्याचे नमूद केले. एका दमदार   प्रतिस्पध्र्याविरुद्ध हा विजय मिळाला असल्याने त्याचे मोल माझ्यासाठी अधिक आहे. त्यामुळे मी समाधानी असल्याचे नदालने नमूद केले.

First Published on August 11, 2018 3:40 am

Web Title: nadal in the quarterfinals of the toronto masters