अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यापासून फॉर्मात असणाऱ्या नाओमी ओसाकाला उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या झँग शुईने चांगलेच झुंजवले. त्यामुळे ओसाकाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला.

जपानच्या २० वर्षीय झँग शुईने नाओमी ओसाकाला इतकी जबरदस्त टक्कर दिली की काही क्षण सामना हातातून निसटण्याची भीती ओसाकाच्या मनात निर्माण झाल्याने तिला अश्रू अनावर झाले होते. सामन्यातील पहिला गेम झँगने ६-३ असा जिंकून घेतला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येदेखील झँगने प्रारंभीचे दोन गेम जिंकून घेतल्याने ओसाका चिंतेत पडली होती.

परंतु त्यानंतर तिने आपला खेळाचा स्तर उंचावत झँगवर आक्रमण केले. अखेरीस दुसरा गेम ६-४ तर तिसरा गेमदेखील अटीतटीच्या लढतीनंतर ७-५ असा जिंकत ओसाकाने उपांत्य फेरी गाठली. पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात इटलीच्या फॅबियो फोगनिनी याने हंगेरीच्या मार्टोन फुकसोविक्सवर ६-४,६-४ अशी सहजपणे मात करत उपांत्य फेरी गाठली आहे.