हिगुएनच्या गोलमुळे फिओरेंटीनाविरुद्ध १-१ अशी बरोबरी

गोंझालो हिगुएनच्या निर्णायक गोलच्या जोरावर नॅपोली क्लबने सीरिज ए फुटबॉल स्पध्रेत फिओरेंटीना क्लबला १-१ असे बरोबरीत रोखून जेतेपदाच्या आशा कायम राखल्या आहेत. हिगुएनने या कामगिरीसह यंदाच्या हंगामात सर्वाधिक २५ गोल आपल्या नावावर केले आहेत. नॅपोलीच्या खात्यात ५८ गुण जमा असून गतविजेत्या युव्हेंट्सपेक्षा ते तीन गुणांनी पिछाडीवर आहेत. युव्हेंट्सने २-० अशा फरकाने इंटर मिलानचा पराभव करून चार गुणांची कमाई केली होती.

सामन्याच्या सहाव्या मिनिटाला फिओरेंटीनाच्या मार्कोस अलोन्सोने गोल करून १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, पुढच्याच मिनिटाला हिगुएनने गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला.

या स्पध्रेतील अव्वल तीन क्लब चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या पुढील हंगामासाठी पात्र ठरणार आहेत आणि नॅपोलीने आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. तिसऱ्या स्थानासाठी रोमा आणि फिओरेंटीना यांच्यात चुरस आहे.