‘‘गेल्या वर्षांत ऑटोपॉलीस सर्किटवर झालेल्या अपघातानंतर बराच काळ शर्यतीबाहेर होतो. हा काळ मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारा होता. त्या दुखापतीतून सावरणे खडतर आव्हान होते,’’ असे मत भारताचा पहिला फॉम्र्युला – वन चालकपटू नरेन कार्तिकेयनने व्यक्त केले. टाटा समूहातर्फे आयोजित कार्यक्रमात तो बोलत होता.
तब्बल आठ महिने सर्किटपासून दूर राहिल्यानंतर कार्तिकेयनने जपानमध्ये नुकत्याच पार पडलेलया सुपर फॉम्र्युला सीरिज स्पध्रेत तिसरे स्थान पटकावून इतिहास घडविला. या कामगिरीबाबत बोलताना कार्तिकेयन म्हणाला, ‘‘कठोर मेहनत आणि मानसोपचारतज्ज्ञ रामजी श्रीनिवासन यांच्या मेहनतीमुळे ते शक्य झाले. पाठीच्या दुखण्याने ग्रस्त असताना कोणत्याच शर्यतीत भाग घेता येत नव्हते. मात्र, मी फार काळ सर्किटपासून दूर राहू शकत नव्हतो आणि मला ते पसंतही नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये कसून सराव केला आणि सुपर फॉम्र्युला सीरिजमध्ये खेळण्याचे निश्चित केले.’’
प्रदीर्घ काळानंतर आणि दुखापतीतून नुकतेच सावरल्यानंतर पहिल्यांदाच स्पध्रेत उतरण्याचे आव्हान तू कसे पेललेस, या प्रश्नावर कार्तिकेयन म्हणाला, ‘‘हे आव्हान सोपे नव्हते. सुरुवातीला जेव्हा अपघात झाला त्या वेळी त्याकडे गांभिर्याने पाहिले नाही, परंतु दुखापत हळुहळू डोकं वर काढत होती. श्रीनिवासन यांनी मला खूप मदत केली आणि जपानमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालो. दडपण होते मात्र सर्वोत्तम कामगिरी करण्याचा निर्धारही केला होता. त्यात यशस्वी झालो याचा आनंद वाटतो. आणखी सात शर्यती आहेत आणि त्याच्या सरावासाठी फार कमी कालावधी आहे.’’

ही लाजिरवाणी बाब
भारतात फॉम्र्युला वन सर्किटमुळे आणि फोर्स इंडिया संघामुळे या खेळाबाबत जागरुकता वाढली आणि प्रसारही झाला. परंतु, या खेळाला हवा तसा पाठिंबा अद्याप मिळालेला नाही आणि म्हणूनच इंडियन ग्रां. प्रि.सारखी स्पर्धा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. मला वाटत नाही की इतक्या लवकर या स्पर्धा आयोजनाचा मान आपल्याला पुन्हा मिळेल. ही आपल्यासाठी लाजिरवाणी बाब आहे, असेही कार्तिकेयन म्हणाला.

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
delivery boy slept on his bike,
“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral