25 September 2020

News Flash

नरिनची गोलंदाजी दोषमुक्त ठरल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सला दिलासा

वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरिनच्या गोलंदाजीच्या शैलीत सुधारणा

| April 9, 2016 04:04 am

वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरिन

वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरिनच्या गोलंदाजीच्या शैलीत सुधारणा आणि पुनर्चाचणी घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) त्याची शैली दोषमुक्त असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे तो आता आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर पुन्हा गोलंदाजी करू शकणार आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर नरिनचा मार्ग मोकळा झाल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सला दिलासा मिळाला आहे.
आयसीसीने घेतलेल्या पुनर्चाचणीत गोलंदाजी करताना नरिनचे कोपर हे नियमानुसार १५ अंशांपेक्षा जास्त नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच त्याच्यावरील संशयास्पद गोलंदाजीच्या शैलीचे मळभ दूर झाले आहे. मात्र त्याच्या गोलंदाजीत पुन्हा संशय आढळल्यास पंचांना पुन्हा त्याविषयी तक्रार दाखल करता येईल. चेन्नईच्या रामचंद्र विद्यापीठात २८ मार्चला ही चाचणी घेण्यात आली.
पल्लेकल येथे ७ नोव्हेंबर २०१५ रोजी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात नरिनच्या गोलंदाजीवर ठपका ठेवण्यात आला आणि त्यानंतर त्याला गोलंदाजी करण्यास मज्जाव करण्यात आला. त्याआधी किमान वर्षभर गोलंदाजीच्या शैलीप्रकरणी तो संघाबाहेर होता. मात्र तीन सामन्यांच्या पुनरागमनानंतर त्याला पुन्हा गोलंदाजीच्या शैलीत सुधारणा करावी लागली. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या प्राथमिक चमूत नरिनच्या नावाचा समावेश होता. मात्र त्याच्या शैलीत सुधारणा समाधानकारक न झाल्यामुळे नंतर त्याचे नाव संघातून वगळण्यात आले. कोलकाता नाइट रायडर्सचा पहिला सामना १० एप्रिलला दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध होणार आहे. मात्र वडिलांच्या निधनामुळे नरिनला मायदेशी परतावे लागणार आहे. त्यामुळे तो पहिला सामना खेळणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 4:03 am

Web Title: narines action cleared ahead of ipl
Next Stories
1 सायनाची उपांत्य फेरीत वाटचाल
2 राष्ट्रीय विजेतेपदाचे सौरभ वर्माचे लक्ष्य
3 भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा -ओल्टमन्स
Just Now!
X