03 December 2020

News Flash

विश्वचषकात टी. नटराजन भारतीय संघासाठी ठरु शकतो X फॅक्टर – व्ही.व्ही.एस लक्ष्मण

हैदराबादकडून नटराजनचा आश्वासक मारा

आयपीएलच्या तेराव्या हंगामात डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाने आश्वासक कामगिरी केली. उपांत्य फेरीत दिल्लीचं आव्हान परतवून लावण्यात ते अपयशी ठरले असले तरीही टी. नटराजनच्या रुपाने हैदराबादला आश्वासक कामगिरी करणारा गोलंदाज सापडला. आयपीएलमध्ये डेथ ओव्हर्समध्ये नटराजनने केलेली कामगिरी ही वाखणण्याजोगी होती. यॉर्कर चेंडू टाकत नटराजनने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश लावला. हैदराबादचा प्रशिक्षक व्ही.व्ही.एस लक्ष्मणच्या मते आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार करता नटराजनसारखा खेळाडू भारतीय संघासाठी X फॅक्टर ठरु शकतो.

“नटराजन हा मेहनती खेळाडू आहे. तो कधीही ट्रेनिंग सेशन्सही बुडवत नाही, प्रत्येकवेळी आपली कामगिरी चांगली कशी होईल याकडे त्याचा कल असतो. हैदराबादमध्ये भुवनेश्वर, संदीप, सिद्धार्थ कौल यांच्यामुळे त्याला गेल्या काही वर्षांत संधी मिळाली नाही. पण ज्यावेळी त्याला संधी मिळाली त्याने संधीचं सोनं केलं. भारतात पुढच्या वर्षी टी-२० विश्वचषकाचं आयोजन आहे. भारतीय संघात सध्याच्या घडीला डेथ ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांची गरज आहे. मोहम्मद शमी, सैनी सध्या चांगली कामगिरी करतायत. पण नटराजन अशा परिस्थितीत संघासाठी X फॅक्टर ठरु शकतो.” Sportstar ला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मण बोलत होता.

दुखापतीमुळे वरुण चक्रवर्तीने भारतीय टी-२० संघातलं आपलं स्थान गमावल्यानंतर नटराजनला संघात स्थान देण्यात आलं आहे. नटराजन सध्या ऑस्ट्रेलियात भारतीय संघासोबत सराव करतो आहे. कसोटी मालिकेचा विचार करता भारतीय संघ व्यवस्थापन शमी आणि बुमराह यांना वन-डे, टी-२० मालिकेत आलटून पालटून संधी देण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत नटराजनला भारतीय अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 7:11 pm

Web Title: natarajan the x factor for team india says laxman psd 91
Next Stories
1 Video: सॉरी वॉर्नर… डेव्हिड वॉर्नरच्या लेकीला आवडतो ‘हा’ क्रिकेटपटू
2 BCCI कडून करारपद्धतीत बदल, टी-२० खेळाडूंनाही मिळणार संधी
3 Video : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणणाऱ्या पुजाराचा कसून सराव
Just Now!
X