ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत फिरकीपटू नॅथन लायनचे ५ बळी आणि त्याला मिचेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्याची मिळालेली साथ याच्या बळावर न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली.

गंभीर-इरफान यांच्यात ‘या’ मुद्द्यावरून मतभेद

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५४ धावांची मजल मारल्यानंतर लायनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा पहिला डाव २५१ धावांवर गडगडला. लायनने ६८ धावांमध्ये पाच बळी मिळवले. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला २०३ धावांची मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही दमदार खेळी केली. वॉर्नरच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाने २ बाद २१७ धावांवर डाव घोषित केला.

वाचा सविस्तर – हा निव्वळ मूर्खपणा – गौतम गंभीर

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर टॉम ब्लंडेल याला मिचेल स्टार्कने २ धावांवर माघारी धाडले. नॅथन लायनने त्याचा अप्रतिम झेल टिपला. ब्लंडेलने वेगवान चेंडूवर फटका लगावला. तो चेंडू हवेत असतानाच अत्यंत चपळाईने नॅथन लायनने झेल टिपला. चेंडू अतिशय वेगात असूनही त्याने हवेतच चेंडू झेलला आणि ब्लंडेलला बाद केले.

हा पहा व्हिडीओ –

 

 
 
 
View this post on Instagram
 
 

 

Can’t keep the GOAT out of the action! #AUSvNZ

A post shared by cricket.com.au (@cricketcomau) on

“भारतात भारताविरूद्ध खेळणं सगळ्यात अवघड”; ऑस्ट्रेलियन फलंदाजाची कबुली

त्यानंतर न्यूझीलंडकडून फारसा संघर्ष पाहायला मिळाला नाही. टॉम लॅथम(१), जीत रावल(१२), फिलिप्स (०) आणि रॉस टेलर (२२) हे पाच फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ५ बाद ३८ झाली होती. त्यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने दमदार अर्धशतक लगावत काही काळ संघर्ष केला. पण तोदेखील ५२ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचे ९ गडी १३६ धावांत बाद झाले. तर गडी दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही. सामन्यात दमदार द्विशतक (२१५) लगावणारा मार्नस लाबूशेन सामनावीर आणि मालिकावीर ठरला.