News Flash

राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा – सायना नेहवाल, सिंधूमध्ये अंतिम लढत

नागपूरकरांना पर्वणी

दोन अव्वल खेळाडूंच्या लढतीत कोण मारणार बाजी?

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या निमीत्ताने नागपूरकरांना दोन दिग्गज खेळाडूंचा अंतिम सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. महिला एकेरी प्रकारात भारताच्या आघाडीच्या खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे पुरुष एकेरी प्रकारात किदम्बी श्रीकांतसमोर एच. एस. प्रणॉयचं आव्हान असणार आहे.

अव्वल मानांकित सिंधूची उपांत्य फेरीत, दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या रुथविका गड्डेशी गाठ पडली होती. २०१६ साली झालेल्या स्पर्धेत रुथविकाने सिंधूवर मात केली होती, त्यामुळे हा सामना रंगतदार होणार असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. अपेक्षेप्रमाणे रुथविकाने सामन्यात धडाकेबाज सुरुवात करत सिंधूला बॅकफूटला ढकललं. पहिला सेट २१-१७ या फरकाने जिंकत रुथविकाने सामन्यात सिंधूला धक्का दिला. मात्र यानंतर सिंधूने आपल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधला सर्व अनुभव पणाला लावत २१-१५, २१-११ अशा फरकाने दुसरा आणि तिसरा सेट जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.

दुसरीकडे सायना नेहवालला दुसऱ्या उपांत्य फेरीत सामन्यात फारसा प्रतिकार झाला नाही. सायनाने पाचव्या मानांकित अनुरा प्रभुदेसाईचा २१-११, २१-१० अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. २००६ आणि २००७ साली सायनाने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे अंतिम फेरीत आता सायना आणि सिंधूच्या लढतीत कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 1:47 pm

Web Title: national badminton championship 2017 p v sindhu and saina nehwal to meet in national championship final match
Next Stories
1 उणे २२ डिग्री तापमानात अॅक्शन सीन करताहेत सलमान-कतरिना
2 एकाच सामन्यात दोन कर्णधार, पाहा काय म्हणताहेत नेटिझन्स
3 जन्मानंतर अवघ्या ६ मिनिटात मुलीला मिळाला आधार क्रमांक 
Just Now!
X