News Flash

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा – ‘फुलराणी’च्या नावावर तिसरं राष्ट्रीय विजेतेपद, अंतिम फेरीत पी. व्ही. सिंधूवर केली मात

सायनाचं तिसरं राष्ट्रीय विजेतेपद

राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाची सिंधूवर मात

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने नागपूरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत सायनाने पी. व्ही. सिंधूवर २१-१७, २७-२५ अशी मात करत आपल्या कारकिर्दीतलं तिसरं राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. याआधी पुरुषांच्या अंतिम सामन्यात एच. एस. प्रणॉयने किदम्बी श्रीकांतवर मात करुन धक्कादायक निकालाची नोंद केली होती.

अवश्य वाचा – राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा – एच. एस. प्रणॉय नवीन विजेता, अंतिम फेरीत किदम्बी श्रीकांतवर केली मात

पहिल्या सेटमध्ये सिंधू आणि सायना नेहवालने सावध पवित्रा घेत सुरुवात केली. दोनही खेळाडूंनी सामन्यात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांनाही त्यात यश आलं नाही. एका क्षणापर्यंत पहिल्या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झालेली असताना, सायनाने सेटमध्ये आघाडी घेतली. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने सामन्यात ११-९ अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र सायनाने पहिल्या सेटमध्ये ४-५ गुणांची आघाडी कायम ठेवली. अखेर सिंधूची लढत मोडून काढत सायनाने पहिला सेट २१-१७ अशा फरकाने आपल्या खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्ये सिंधू सायनाला कडवी टक्कर देईल अशी सर्वांची अपेक्षा होती. याप्रमाणे सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये सिंधूने सामन्यात ६-४ अशी आघाडीही घेतली होती. मात्र सायना नेहवालने तिची ही आघाडी फारकाळ टिकू दिली नाही. पण सिंधूनेही लढाऊ बाणा दाखवत दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ११-८ अशी आघाडी घेतली. मध्यांतरानंतही सिंधूने काहीकाळ आपल्याकडे आघाडी कायम ठेवली होती. मात्र सायनाने लढाऊ वृत्ती दाखवत सेटमध्ये १८-१८ अशी बरोबरी साधली. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये सामना खिशात घालण्यासाठी द्वंद्वं सुरु राहिलं. मात्र यावेळी सायनाने आपला सर्व अनुभव पणाला लावत दुसरा सेट २७-२५ अशा फरकाने जिंकत राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावे केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 9:02 pm

Web Title: national badminton championship 2017 saina nehwal claims her 3rd national championship defeat p v sindhu in final
टॅग : Pv Sindhu,Saina Nehwal
Next Stories
1 …तर मी भारताच्या विजयाची खात्री देऊ शकत नाही – जोर्द मरीन
2 या कारणांमुळे विक्रमवीर प्रणव धनावडेने एमसीएची शिष्यवृत्ती नाकारली
3 घरच्या मैदानावर मुंबई खेळणार ५०० वा रणजी सामना, मुंबईसमोर बडोद्याचं आव्हान
Just Now!
X