News Flash

राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धा : छत्तीसगड संघाला तिहेरी यश; महाराष्ट्राला दोन कांस्य

गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात ही स्पर्धा घेण्यात आली.

गोंदिया जिल्हा सायकल पोलो असोसिएशन व महाराष्ट्र राज्य सायकल पोलो असोसिएशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेत छत्तीसगड संघाने वरिष्ठ, ज्युनियर व सबज्युनियर मुलींच्या गटात बाजी मारत तिहेरी यश संपादन केले. यजमान महाराष्ट्र संघ वरिष्ठ महिला व ज्युनियर मुलींमध्ये कांस्यपदक जिंकले.

गोंदिया येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात ही स्पर्धा घेण्यात आली. वरिष्ठ महिलांच्या अंतिम सामन्यात छत्तीसगड संघाने चुरशीच्या लढतीत केरळ संघाला ५-४ अशा गोलफरकाने पराभूत केले. ज्युनियर मुलींच्या अंतिम सामन्यात छत्तीसगडने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत केरळ संघाला २३-० अशा मोठय़ा गोलफरकाने नमवून बाजी मारली. सबज्युनियर मुलींमध्ये छत्तीसगडने उत्तर प्रदेश संघाला ७-४ अशा गोलफरकाने नमवून विजेतेपद पटकावले. राष्ट्रीय बास्केटबॉलपटू भावना कदम यांच्या हस्ते तिन्ही गटातील विजेत्या, उपविजेत्या व तिसऱ्या स्थानावरील संघाला पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी  जिल्हा असोसिएशनचे उपाध्यक्ष गजेंद्र फुंडे, भारतीय सायकल पोलो महासंघाचे महासचिव गजानन बुरडे, दिनेश सार्वे, महेंद्र हेमणे, आंतरराष्ट्रीय खेळाडू मिलिंद पटले उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 1:12 am

Web Title: national bicycle polo competition akp 94
Next Stories
1 जागतिक अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा : हम्पीला अतिजलद प्रकारात १२वे स्थान
2 भारत-द.आफ्रिका क्रिकेट मालिका : भारतीय युवा संघ अखेरच्या सामन्यात पराभूत
3 शारापोव्हाला दमदार पुनरागमनाचा विश्वास
Just Now!
X