सोलापूर : मुंबई उपनगरला सलग तिसऱ्यांदा राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा अक्षय भांगरे आणि रत्नागिरीची अपेक्षा सुतार यांच्याकडे ५३व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी अनुक्रमे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

अलोन पब्लिक स्कूल, छत्तीसगड येथे २६ ते ३० डिसेंबरदरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी बुधवारी गतविजेत्या महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर करण्यात आले. सोलापूरला झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर या स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात आली आहे.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
Supriya Sule Vs Sunetra Pawar
ठरलं! बारामतीत नणंद-भावजयीचा सामना, सुप्रिया सुळेंचं नाव जाहीर होताच सुनेत्रा पवारांच्या नावाचीही घोषणा
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?

महाराष्ट्राचे संघ

’ पुरुष : अक्षय भांगरे (कर्णधार), ऋषिकेश मुर्चावडे, दुर्वेश साळुंखे, अनिकेत पोटे, प्रतीक वाईकर, अक्षय गणपुले, सुयश गरगटे, महेश शिंदे, रामजी कश्यप, सुरेश सावंत, सूरज लांडे, सागर लेंगरे, निखिल कापुरे, हर्षद हातणकर, दीपक माने. प्रशिक्षक : बिपिन पाटील, व्यवस्थापक : श्रीकांत ढेपे

’ महिला : अपेक्षा सुतार (कर्णधार), प्रियंका इंगळे, काजल भोर, रेश्मा राठोड, कोमल दारवटकर, श्वेता वाघ, रुपाली बडे, तेजश्री कोंडाळकर, निकिता पवार, ऋतुजा खरे, ज्योती मुकाडे, प्रतीक्षा खुरंगे, प्राजक्ता पवार, ऋतिका मगदुम, स्नेहल जाधव. प्रशिक्षक : महेश पालांडे, व्यवस्थापक : रोहिणी ढेपे