News Flash

सैराट झालं जी..! स्मृती मंधानाचा फोटो पाहून चाहते झाले घायाळ

इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत स्मृतीचा केस बांधतानाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

स्मृती मंधाना

ब्रिस्टॉलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंड विरुद्धचा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आले. तब्बल सात वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या या संघात अनेक नवीन खेळाडूंनी पदार्पण केले होते. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केलेली भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना चर्चेत आली. तिचा मैदानावरील केस बांधतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

या फोटोसह तिला अनेकांनी ‘नॅशनल क्रश’ अशी उपमा दिली. अनेक चाहत्यांनी तिच्या लूक्सची वेगवेगळ्या पद्धतीने प्रशंसा केली आहे.

 

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashish Uikey (@ashishuikey_97)

 

 

 

हेही वाचा – शिमला फिरणाऱ्या महेंद्रसिंह धोनीचा ‘दमदार’ लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

स्नेह राणाची अष्टपैलू कामगिरी आणि शफाली वर्माच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघ इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने ९ बाद ३९६ धावांवर आपला डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल टीम इंडिया पहिल्या डावात २३१ धावांवर बाद झाली. इंग्लंडने भारताला फॉलोऑन दिला. त्यानंतर अखेरच्या दिवशी दुसर्‍या डावात ८ बाद ३४४ धावा करुन भारताने सामना वाचवला. दोन्ही डावात अर्धशतके ठोकणाऱ्या शफालीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 4:53 pm

Web Title: national crush smriti mandhanas beautiful photo getting viral during england test adn 96
Next Stories
1 शिमला फिरणाऱ्या महेंद्रसिंह धोनीचा ‘दमदार’ लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
2 कडकच..! एक विकेट घेत दोन विक्रम नावावर करणारा गोलंदाज म्हणजे इशांत शर्मा
3 Euro Cup 2020: युक्रेन, ऑस्ट्रियाचं भवितव्य आजच्या सामन्यावर; कोण मारणार बाजी?
Just Now!
X