News Flash

राष्ट्रीय कबड्डीपटू पूजा आगरकरचा अपघाती मृत्यू

या घटनेने अमरावती विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये कमालीची हळहळ व्यक्त होत आहे.

पूजा आगरकर

संघातील प्रिया काळे जखमी; अमरावती विद्यापीठात शोककळा

रत्नागिरी येथे सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पध्रेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूतील राष्ट्रीय खेळाडू पूजा आगरकर (२०) सोमवारी बसने दिलेल्या धडकने ठार झाली. याच चमूतील प्रिया काळे जखमी झाली.
रत्नागिरी येथे आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पध्रेत पश्चिम विभागामधून खेळण्यासाठी अमरावती विद्यापीठातून कला महाविद्यालय बडनेरा येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. खुशाल अळसपूरे व दत्तात्रय कला महाविद्यालय, नांदगावपेठ येथील श्रीकांत माहूरकर यांच्या नेतृत्वाखाली बारा खेळाडूंची चमू गेली होती. या चमूतील खेळाडू मुली जेवण केल्यानंतर आपल्या निवासस्थानाकडे पायी जात असतांना भरधाव एस.टी. बसने या दोघींनाही धडक दिली. यात पूजा ठार झाली, तर प्रिया काळे जखमी झाली असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पूजा आगरकर ही पांढरकवडा येथील मोघे महाविद्यालयाची द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी होती. तिचे पार्थिव मंगळवारी रात्री उशिरा पांढरकवडा येथे आणण्यात आले. जखमी प्रिया काळे ही खामगावच्या मोहता महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या घटनेने अमरावती विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये कमालीची हळहळ व्यक्त होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 3:43 am

Web Title: national kabaddi player pooja agarkars accidental death
Next Stories
1 वैदेही चौधरी अजिंक्य
2 भारतीय संघाला बीसीसीआयकडून दोन कोटींचे बक्षिस
3 ‘आयपीएल’मध्ये पुणे आणि राजकोट संघाचा समावेश