24 September 2020

News Flash

भारतीय रेल्वेला विजेतेपद

महाराष्ट्राला हरवणाऱ्या रेल्वेने सेनादलाचाही एकतर्फी पराभव केला.

अलिबागमधील रोहा येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने अंतिम फेरीत सेनादलाचा ४१-१७ असा पराभव करून राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राला हरवणाऱ्या रेल्वेने सेनादलाचाही एकतर्फी पराभव केला. सेनादलाच्या विजयात पवन कुमारनेच महत्त्वाची भूमिका बजावली.

स्वस्तिक, बंडय़ा मारुती यांची विजयी सलामी

उजाला क्रीडा मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत श्रीराम, स्व. आकाश, मावळी मंडळ, स्वस्तिक, बंडय़ा मारुती या संघांनी विजयी सलामी नोंदवली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भिवंडी येथील तलाव गार्डन मैदानावर सुरू झालेल्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पालघरच्या श्रीराम संघाने ठाण्याच्या विवेक स्मृती संघाला ३५-२३ असे पराभूत केले. मध्यंतराला १४-१३ अशी नाममात्र आघाडी घेणाऱ्या श्रीरामाने उत्तरार्धात आपला खेळ गतिमान करत हा विजय साकारला. स्वप्नील लोखंडे, प्रशांत खेडेकर या विजयाचे शिल्पकार ठरले.

ठाण्याच्या स्व. आकाश संघाने उपनगरच्या केदारनाथचा ५०-२१ असा धुव्वा उडवत आगेकूच केली. मध्यंतरापर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात केदारनाथ संघ १६-१५ असा आघाडीवर होता. मात्र त्यानंतर त्यांना खेळात सातत्य राखता आले नाही. आकाश संघाच्या विकास, विशाल आणि महेश या पाटील बंधूनी हा सामना आपल्याकडे झुकविला.

मुंबई शहरच्या बंडय़ा मारुतीने ठाण्याच्या जयशिव संघाला ३३-३२ असे चकवले. विनोद अत्याळकरचा संयमी खेळ या विजयात महत्त्वाचा ठरला. मावळी मंडळच्या संघाने चुरशीच्या लढतीत हनुमान मंडळाला २६-२५ असे पराभूत केले. राजेश भिलारे, अभिजित घरे या विजयात चमकले. स्वस्तिकने विजय म्हसोबावर ३५-२१ अशी मात केली. सिद्धेश पांचाळ, अक्षय बरडे यांचा खेळ या विजयात महत्त्वपूर्ण ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:51 am

Web Title: national kabaddi tournament
Next Stories
1 Budget 2019 : अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी २१४ कोटींची वाढ!
2 Video : अफगाणिस्तानच्या शहझादने केला Dhoni Style रन आऊट
3 लोकेश राहुलच्या फॉर्मची चिंता करू नका – द्रविड
Just Now!
X