सौम्या बेबीने २० किलोमीटर राष्ट्रीय चालण्याच्या शर्यतीत विक्रमासह सुवर्णपटक पटकावले. तिरुवअनंतपूरम येथील रहिवासी असलेल्या, परंतु आता दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सौम्याने ही शर्यत एक तास ३१ मिनिटे २८.७२ सेकंदांत पार केले आणि खुशबीर कौरचा विक्रम मोडला.

खुशबीरने हे अंतर एक तास ३१ मिनिटे ४० सेकंदांत पार करीत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. खुशबीरकडून येथे सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने हे अंतर एक तास ३२ मिनिटे १६.९६ सेकंदांत पार केले होते. करमजीत कौरने हे अंतर एक तास ३४ मिनिटांत पूर्ण करीत कांस्यपदक पटकावले.

पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत केरळच्या के. टी. इरफानने सुवर्णपदक जिंकले. त्याने हे अंतर एक तास २१ मिनिटे ३१.२५ सेकंदांत पार केले. ही शर्यत एक तास ३१ मिनिटे ३१.७२ सेकंदांत पूर्ण करणाऱ्या मनीष सिंगला रौप्यपदक मिळाले. हरयाणाच्या नीरजकुमारला कांस्यपदक मिळाले. त्याला ही शर्यत पूर्ण करण्यासाठी एक तास २१ मिनिटे ३९.२० सेकंद वेळ लागला.