कोणत्याही कारणाविना राष्ट्रीय कुस्ती शिबिरात दाखल न झालेल्या चार फोगट भगिनींपैकी गीता, रितू आणि संगीता यांना शिबिरात समाविष्ट करून घेण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने जाहीर केला आहे. मात्र, अद्यापही शिबिरात न येण्याचे कारण न दिलेल्या बबिता फोगटला प्रवेश देण्यात आलेला नसून तिच्याबाबतची संदिग्धता कायम आहे.

काहीही कारणमीमांसा न देता शिबिरास न आलेल्या फोगट भगिनी आणि अन्य ११ कुस्तीपटूंना शिबिरात दाखल करून घेणार नसल्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यात बदल करून पुन्हा तीन भगिनींना लखनौला सुरू शिबिरात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. त्यामुळे जकार्ता आशियाई स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीत या तिघी फोगट भगिनी खेळू शकणार आहेत; परंतु बबिताचा त्यात अंतर्भाव केलेला नसल्याचेही महासंघाने नमूद केले आहे. महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांनी बबिताने अद्यापही कोणतेही कारण दिले नसल्याने तिला आम्ही शिबिरात सहभागी होऊ देणार नसल्याबाबत ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे तिला जकार्ता आशियाई स्पर्धेच्या पात्रता सामन्यांमध्ये किंवा स्पर्धेतही सहभागी होता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
Secular Parishad in Dhule
जातीयवाद्यांना रोखण्याचा धुळ्यातील सेक्युलर परिषदेचा निर्धार
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महासंघाने अन्य ११ कुस्तीपटूंनाही त्याच कारणास्तव प्रवेश नाकारल्याने कुस्तीच्या क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच ‘दंगल’ प्रदर्शित झाल्यापासून फोगट भगिनींचे नाव सर्वत्र गाजत असून त्यामुळे कुस्ती खेळालादेखील चालना मिळाली आहे. तरीदेखील त्यांच्यावरही कुस्ती महासंघाने कारवाईचा बडगा उगारल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. मात्र, त्यातून आता किमान तीन भगिनींना संधी देण्याचा निर्णय झाला आहे.