युवा गटाची राष्ट्रीय मैदानी स्पर्धा येथे २ ते ४ एप्रिल दरम्यान होत असून, या स्पर्धेनेच यंदाच्या राष्ट्रीय स्तरावरील अ‍ॅथलेटिक्स मोसमास सुरुवात होत आहे.
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका निश्चित करण्यात आली. भारतीय ग्रां.प्रि स्पर्धाच्या मालिकेतील पहिली स्पर्धा पतियाळा येथे १५ एप्रिल रोजी होणार असून दुसरी स्पर्धा संगरुर (पंजाब) येथे १९ एप्रिल रोजी आयोजित केली जाईल. मंगलोर येथे या मालिकेतील तिसरी स्पर्धा २५ एप्रिल रोजी होणार आहे. त्याच ठिकाणी १ ते ४ मे दरम्यान फेडरेशन चषक स्पर्धा होईल. चेन्नई येथे २१ ते २४ जून दरम्यान वरिष्ठ आंतर राज्य स्पर्धेचे आयोजन केले जाईल. कनिष्ठ गटाची आंतर राज्य स्पर्धा जूनमध्ये बंगळुरू येथे होणार असून, त्याच्या अंतिम तारखा लवकरच निश्चित केल्या जाणार आहेत. कनिष्ठ गटाची फेडरेशन स्पर्धा ७ व ८ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे होईल. नवी दिल्ली येथे ६ सप्टेंबर रोजी चौथी भारतीय ग्रां.प्रि स्पर्धा घेतली जाणार आहे. वरिष्ठ खुली राष्ट्रीय स्पर्धा कोलकाता येथे सप्टेंबरमध्ये होणार आहे तर कनिष्ठ गटाची स्पर्धा ३ ते ७ नोव्हेंबर दरम्यान लखनौ येथे घेतली जाणार आहे. १० जानेवारी २०१६ रोजी पुण्यात राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन केले जाईल.