News Flash

नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धा : स्पेनचा युक्रेनवर दमदार विजय

रामोसने तिसऱ्या मिनिटाला पेनल्टीवर आणि २९व्या मिनिटाला गोल झळकावल्यानंतर फाटीने ३२व्या मिनिटाला तिसरा गोल केला.

सर्जियो रामोस

 

सर्जियो रामोस तसेच युवा फुटबॉलपटू अन्सू फाटी यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर स्पेनने नेशन्स लीग फुटबॉल स्पर्धेत युक्रेनवर  ४-१ असा दमदार विजय मिळवला.

रामोसने तिसऱ्या मिनिटाला पेनल्टीवर आणि २९व्या मिनिटाला गोल झळकावल्यानंतर फाटीने ३२व्या मिनिटाला तिसरा गोल केला. स्पेनकडून गोल झळकावणारा तो सर्वात युवा (१७ वर्षे ३११ दिवस) फुटबॉलपटू ठरला आहे. त्यानंतर फेरान टोरेसने चौथा गोल लगावत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

जर्मनीला नेशन्स लीगमध्ये पहिल्या विजयाची उत्सुकता लागली असून रविवारी त्यांना स्वित्झर्लंडने १-१ असे बरोबरीत रोखले. इकाय गुंडोजेन याने १४व्या मिनिटाला जर्मनीचे खाते खोलल्यानंतर सिल्वन विडमेर याने ५७व्या मिनिटाला स्वित्झर्लंडला बरोबरी साधून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:18 am

Web Title: nations league football tournament spains victory over ukraine abn 97
Next Stories
1 मुंबईच्या प्रशिक्षक पदांच्या मुलाखती उद्या
2 मराठमोळा प्रवीण तांबे गाजवतोय CPL, थरारक कॅच आणि भेदक मारा…पाहा हा व्हिडीओ
3 Eng vs Aus : Bio Security Bubble मोडल्यामुळे जोस बटलर अखेरच्या टी-२० ला मुकणार
Just Now!
X