भालाफेकपटू नीरज चोप्राने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताल सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. ऑलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स इव्हेंट्समध्ये १२१ वर्षांनंतर भारताला पहिलं सुवर्णपदक मिळालं आहे. यानंतर नीरज चोप्राचं नाव प्रत्येक भारतीयांच्या ओठांवर आहे. त्याचे काही अनुभव आणि मुलाखतींमधील आठवणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. असाच एक विमानातील अनुभव त्याने शेअर केला आहे. आपला मृत्यू डोळ्यासमोर असल्याचा थरारक अनुभव त्याने कार्यक्रमात शेअर केला.

नीरज चोप्राने ऑलिम्पिकसाठी जर्मनीत खूप सराव केला होता. यासाठी एकदा तो अबुधाबीवरून विमानाने जर्मनीच्या फ्रँकफर्ट शहरात जात होता. या प्रवासादरम्यान विमानाच्या लाईट्स बंद झाल्या आणि विमान वेगाने खाली येऊ लागलं होतं. “त्या वेळेस मी हेडफोन लावले होते. हेडफोन काढल्यानंतर बघितलं. विमानातील सर्वजण जोरजोराने ओरडत होते. मुलं रडत होती. सगळ्यांना वाटलं विमान कोसळणार आहे. माझ्या बाजूला प्रशिक्षक बसले होते. मी त्यांना सांगितलं जे होणार आहे ते होणार आहे. विमान कोसळलं तरी ते कोण वाचवू शकणार नाही. घाबरून काहीच उपयोग नाही. कारण आपण काहीच करू शकत नाही. मात्र काही वेळानंतर विमान स्थिर झालं आणि फ्रँकफर्ट शहरात सुरक्षितरित्या उतरलं”, असा थरारक अनुभव नीरज चोप्राने सांगितला.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@s.s.r_insta)

काही दिवसांपूर्वी नीरज चोप्राने त्याच्या आई वडिलांनी पहिल्यांदाच विमानप्रवास घडवून आणला होता. यानिमित्ताने त्याने त्याचे फोटो ट्विटवर शेअर केले होते. “आयुष्यातील एक स्वप्न पूर्ण झाले जेव्हा मला पहिल्यांदा माझे आई -वडील विमानामध्ये बसलेले दिसले. सर्वांच्या प्रार्थना आणि आशीर्वादांसाठी नेहमीच कृतज्ञ राहीन, असे नीरजने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होतं.