News Flash

महिला क्रिकेटपटूंची उपेक्षा

भारतीय महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयने आपल्या आधिपत्याखाली सामावून घेतले असले तरी त्यांना वागणूक उपेक्षेचीच मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतीय महिला संघ बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय

| April 12, 2013 05:29 am

भारतीय महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयने आपल्या आधिपत्याखाली सामावून घेतले असले तरी त्यांना वागणूक उपेक्षेचीच मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतीय महिला संघ बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तीन सामन्यांची मालिका भारतीय संघाने याआधीच जिंकली आहे. मात्र या विजयासाठी त्यांना कोणताही करंडक मिळणार नाही. कारण मालिका विजयासाठीचा करंडक स्पर्धेच्या ठिकाणी पोहचवण्याची व्यवस्था बीसीसीआयने अद्याप केलेली नाही. स्पर्धेचा तिसरा आणि अंतिम सामना शुक्रवारी खेळला जाणार आहे.
विशेष म्हणजे भारतीय संघाने तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका ३-०नेच जिंकली. मात्र या निर्विवाद विजयानंतरही या मालिकेसाठी त्यांना करंडक मिळालेला नाही. यासंदर्भात बीसीसीआयकडून आम्हाला कोणतेही अधिकृत सूचना मिळालेली नाही. ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विजेत्या संघाला करंडकच नव्हता. मालिकावीर खेळाडूसाठीही कोणतीही बक्षीस रक्कम नसल्याचेही गुजरात क्रिकेट संघटनेचे सचिव राजेश पटेल यांनी सांगितले.
दरम्यान ही मालिका आयत्यावेळी आयोजित झाल्याने करंडक उपलब्ध होऊ शकला नसल्याचे बीसीसीआयचे खेळ विकास सरव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी सांगितले. याआधीच्या मालिकेतही सामन्यातील सर्वोत्तम आणि मालिकेतील सर्वोत्तम खेळाडूला पुरस्कार देण्याची व्यवस्था नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 5:29 am

Web Title: negligence woman cricket player
टॅग : Sports
Next Stories
1 .. तर संघ आदेशाची पायमल्ली करेन- वेटेल
2 सेहवागचे भारतीय संघात पुनरागमन अशक्य- जेफ्री बॉयकॉट
3 सायनाला अग्रमानांकन
Just Now!
X