18 November 2019

News Flash

ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड…16 वर्षीय नेपाळी खेळाडूने मोडला सचिनचा विक्रम !

दुबईविरुद्ध सामन्यात केली खेळी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळचा तरुण खेळाडू रोहित पौडेलने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. दुबईत झालेल्या सामन्यात रोहितने संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध अर्धशतक झळकावलं. या कामगिरीसह रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. रोहितने आपल्या वयाच्या 16 वर्ष 146 दिवसांमध्ये अशी कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या वयाच्या 16 वर्ष 213 व्या दिवशी अर्धशतक झळकावलं होतं.

रोहितने 58 चेंडूत 55 धावांची खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सचिनने 1989 साली पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती.

First Published on January 27, 2019 8:20 am

Web Title: nepal prodigy paudel eclipses tendulkar record aged 16