01 March 2021

News Flash

‘दिल्ली कॅपिटल्स’चा खेळाडू ऑस्ट्रेलियात करोना पॉझिटिव्ह

नुकाताच युएइमध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा थरार पार पडला.

नुकाताच युएइमध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा थरार पार पडला. मुंबईनं दिल्लीवर मात करत पाचव्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरलं. दिल्ली कॅपिटल्स संघातील फिरकी गोलंदाजाला ऑस्ट्रेलियात करोनाची लागण झाली आहे. दिल्लीच्या संघातील नेपाळचा संदीप लामीचाने ऑस्ट्रेलियाला बिग बॅश लीगचा दहाव्या हंगामासाठी गेला आहे. दोन आठवड्यात बिग बॅश लीगला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच संदिप लामीचाने याला करोनाची लागण झाली आहे. संदीपनं ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. होबार्ट हरिकेन्सने संदीप लामीचानेसोबत करार केला आहे.

२० वर्षीय संदीपनं ट्विट करत म्हटले की, ‘मला करोना झाल्याचं तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. बुधवारपासून माझं अंग दुखत होतं, आता माझ्या प्रकृतीत सुधारणा आहे. जर सर्व ठीक झालं तर पुन्हा मैदानात पुनरागमन करेन. माझ्यासाठी प्रार्थना करा.’

गतवर्षी संदीपनं बिग बॅश लीगमध्ये दमदार कामगिरी केली होती. मेलबर्न स्टार्सकडून खेळताना दमदार कामगिरी केली होती. आयपीएलचा करार करणारा संदीप पहिला नेपाळी खेळाडू होता. संदीपला दिल्लीच्या संघानं २०१८ मध्ये करारबद्ध केलं होतं. यंदाच्या हंगामात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. संदीपनं दिल्लीकडून खेळताना ९ सामन्यात १३ विकेट घेतल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 6:32 pm

Web Title: nepal spinner sandeep lamichhane tests positive for covid 19 nck 90
Next Stories
1 VIDEO: भरमैदानात फिल्डींग करताना वॉर्नरने केला ‘बुट्टा बोम्मा’ गाण्यावर भन्नाट डान्स
2 ४० व्या वर्षी धमाका! अवघ्या २० चेंडूत झळकावलं अर्धशतक
3 भारतीय संघाला हवाय ऑलराऊंडर प्लेअर, हार्दिक म्हणतो…माझ्या घरी एक बसला आहे !
Just Now!
X