आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीकडून नेपाळला वन-डे क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा मिळाल्यानंतर, पहिल्यांदाच नेपाळचा संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करणार आहे. नेदलँडविरुद्ध नेपाळचा संघ दोन वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. १ आणि ३ ऑगस्टरोजी हे दोन सामने खेळवले जाणार असल्याची माहिती नेदरलँड क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

नेपाळच्या संघासाठी ही सर्वात मोठी संधी असणार आहे. याव्यतिरीक्त नेपाळ क्रिकेट बोर्ड आयर्लंड, स्कॉटलंड यांसारख्या देशांच्या क्रिकेट बोर्डांशी सामने खेळवण्याबद्दल विचारात आहे. नेदरलँडविरुद्ध मालिकेआधी नेपाळचा संघ २९ जुलै रोजी लॉर्ड्सवर होणाऱ्या तिरंगी मालिकेतही सहभाग नोंदवणार आहे.