News Flash

शूटआउट @ साल्वाडोर!

फिफा विश्वचषक २०१४चे ‘सरप्राइज पॅकेज’ ठरलेल्या कोस्टा रिकाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत बलाढय़ नेदरलँड्सला झुंजवले. नेदरलँड्ससारख्या बलाढय़ संघाला पेनल्टी-शूटआऊटपर्यंत कोस्टा रिकाविरुद्ध लढावे लागले.

| July 7, 2014 01:37 am

फिफा विश्वचषक २०१४चे ‘सरप्राइज पॅकेज’ ठरलेल्या कोस्टा रिकाने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत बलाढय़ नेदरलँड्सला झुंजवले. नेदरलँड्ससारख्या बलाढय़ संघाला पेनल्टी-शूटआऊटपर्यंत कोस्टा रिकाविरुद्ध लढावे लागले. गोलशून्य अवस्थेतील १२० मिनिटांनंतर अतिरिक्त वेळेच्या अखेरीस मैदानावर उतरलेला राखीव गोलरक्षक टिम क्रूल पेनल्टी-शूटआऊटमधील नेदरलँड्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. उत्कंठावर्धक झालेल्या या सामन्यात क्रूलने ब्रायन रुइझ आणि मायकेल उमाना यांच्या पेनल्टी अडवत नेदरलँड्सच्या विजयावर ४-३ असे शिक्कामोर्तब केले. रॉबिन व्हॅन पर्सी, आर्येन रॉबेन, वेस्ले श्नायडर आणि डिर्क क्युयट या अव्वल खेळाडूंनी पेनल्टीवर नेदरलँड्ससाठी गोल केले. या विजयासह नेदरलँड्सने सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक मारली. आता ९ जुलैला होणाऱ्या सामन्यात नेदरलँड्सला अर्जेटिनाशी दोन हात करावे लागतील.
निर्धारित वेळेत आणि त्यानंतर अतिरिक्त वेळेतही सामना गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर नेदरलँड्सचा गोलरक्षक जॅस्पर सिल्लेसेन याने रुइझ आणि उमाना यांचे प्रयत्न रोखत नेदरलँड्सला उपांत्य फेरीचे तिकीट मिळवून दिले. कोस्टा रिकाने १२० मिनिटांत मोजक्याच वेळा नेदरलँड्सच्या गोलक्षेत्रात हल्ला चढवला. पण पेनल्टी-शूटआऊटमध्ये त्यांचा संघ काहीही करू शकतो, हे नेदरलँड्सचे प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांनी ओळखले होते. ग्रीसविरुद्घच्या सामन्यात पेनल्टी-शूटआऊटमध्ये कोस्टा रिकाने पाचही गोल करत गोलरक्षक केयलर नवासच्या सुरेख कामगिरीमुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते. म्हणूनच व्हॅन गाल यांनी क्रूलला १२०व्या मिनिटाला मैदानात उतरवले आणि तोच क्रूल नेदरलँड्ससाठी हीरो ठरला.

माझे स्वप्न पूर्ण झाले!
माझे स्वप्न पूर्ण झाले. सामना पेनल्टी-शूटआऊटपर्यंत जाईल, याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळेच प्रशिक्षकांनी मला सज्ज राहण्याचा सल्ला दिला होता. पेनल्टी-शूटआऊटमध्ये सर्वोत्तम कामगिरी साकारून नेदरलँड्सच्या विजयात योगदान देता आल्याचा मला अभिमान आहे.
– टिम क्रूल, नेदरलँड्सचा गोलरक्षक
नेदरलँड्सचे सर्व प्रयत्न निष्फळ
व्हॅन गाल यांनी या सामन्यासाठी आक्रमक फळी मैदानात उतरवली होती. सुरुवातीपासूनच एकामागोमाग जोरदार हल्ले चढवल्यानंतरही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही. वेस्ले श्नायडरचे दोन सुरेख फटके गोलबारला लागून बाहेर गेले. त्यानंतर दोन वेळा नेदरलँड्सच्या आघाडीवीरांना चेंडूवर नियंत्रण मिळवता आले नाही. अन्यथा, या दोन्ही वेळेला गोल होऊ शकले असते. दोन मिनिटे शिल्लक असताना रॉबिन व्हॅन पर्सीने मारलेला फटका नवासने अडवला होता. अनेक वेळा गोल करण्याच्या संधी निर्माण केल्यानंतर नेदरलँड्सच्या आक्रमकवीरांना साहाय्यक रेफ्रींकडून ‘ऑफ साइड’चा कौल मिळत होता. ११५व्या मिनिटाला कोस्टा रिकाला सामन्यातील पहिला कॉर्नर मिळाला. पण त्यावर त्यांना गोल करता आला नाही. अतिरिक्त वेळेची दोन मिनिटे शिल्लक असताना चेंडूवर ताबा मिळवताना क्लास जॅन हन्टेलारने नवासच्या डोळ्यावर फटका मारला होता. त्यामुळे हंटेलारला पिवळे कार्ड दाखवण्यात आले. पेनल्टी-शूटआऊटसाठी प्रतिस्पध्र्याच्या गोलरक्षकाला जायबंदी करण्याचा हा प्रयत्न होता.
जगज्जेतेपद दोन पावलांवर..
१२ जुलै (रात्री १.३० वा.)
तिसऱ्या स्थानासाठी
ब्राझिलिय

अंतिम फेरी
१३ जुलै (रात्री १.३० वा.)
ब्राझिलिय विरुद्ध रिओ दी जानिरो  

९ जुलै (रात्री १.३० वा.)
नेदरलँड्स  विरुद्ध अर्जेटिना
साओ पावलो

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:37 am

Web Title: netherlands vs costa rica
Next Stories
1 रणनीतीमध्ये आता बदल हवा!
2 आजोबांच्या मृत्यूच्या दु:खावर मात करून मार्सेलोचे सरावाला प्राधान्य!
3 जिंकलो रे!
Just Now!
X