09 March 2021

News Flash

गुगलचा नवा गोंधळ! आता म्हणे.. सारा तेंडुलकर शुभमन गिलची बायको

अनुष्का शर्मापाठोपाठ साराबाबतही गुगलचा घोळ

सारा तेंडुलकर गुगल सर्च इंजिनवर सध्या चर्चेत आहे ती एका वेगळ्यात कारणामुळे. शुभमन गिलची पत्नी असं सर्च केलं तर नाव येतं ते सारा तेंडुलकर. त्यामुळे गुगलचं नेमकं गंडलंय तरी काय? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय रहात नाही. काही दिवसांपूर्वीच विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला लेगस्पिनर रशिद खानची पत्नी असल्याचा जावई शोध गुगलने लावला होता. आता मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही शुभमन गिलची पत्नी आहे असा नवा गोंधळ गुगलने घातला आहे. भारताचा युवा क्रिकेटपटून शुभमन गिलची पत्नी असे सर्च केल्यास सारा तेंडुलकरचे नाव येते आहे.

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच १२ ऑक्टोबरलाच सारा तेंडुलकरने तिचा २३ वा वाढदिवस साजरा केला. सारा शक्यतो प्रसारमाध्यमांपासून दूर राहणेच पसंत करते. सारा तेंडुलकर ही अपनालय या संस्थेसाठीही काम करते आहे. साराचं लग्नही झालेलं नाही. तरीही शुभमन गिलची पत्नी असं सर्च केल्यास तिचं नाव दाखवलं जातं आहे.

आपल्याला ठाऊकच आहे की गुगल हे सर्च इंजिन जगभरात प्रसिद्ध आहे. वाचण्यात आलेले लेख, बातम्या यांचे रिझल्ट दाखवण्याचं काम गुगल करतं. गुगल हे जगभरात लोकप्रिय असलेलं सर्च इंजिन आहे. विविध प्रकारच्या माहितीच्या खजिन्यापर्यंत आपल्याला गुगलद्वारे पोहचता येतं. मात्र याच गुगलचा गेल्या काही दिवसांमध्ये काहीसा गोंधळ उडाल्याचं दिसतं आहे. त्यामुळे रशिद खानची पत्नी सर्च केलं की अनुष्का शर्माचं नाव तर शुभमन गिलची पत्नी म्हणून सर्च केल्यास सारा तेंडुलकरचं नाव येतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 2:11 pm

Web Title: new googly by google now show sara tendulkar as wife of shubhman gill scj 81
Next Stories
1 निवड समिती अध्यक्षपदावरून मिसबा-उल-हक पायउतार
2 न्यूझीलंडचे माजी कसोटीपटू जॉन रीड यांचे निधन
3 नेशन्स लीग फुटबॉल : युक्रेनचा स्पेनवर पहिला विजय
Just Now!
X