18 March 2019

News Flash

अबब! एकाच षटकात चोपल्या तब्बल ४३ धावा

त्या षटकात सहा षटकारांचाही होता समावेश

क्रिकेटमध्ये रोज नवनवे विक्रम होत असतात. नुकत्याच झालेल्या भारत विंडीज सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने टी२० मध्ये ४ शतके झळकावण्याचा विक्रम केला. झिम्बाब्वेच्या संघाने खूप वर्षांनी कसोटी सामना जिंकला. पण यापेक्षा आश्चर्यकारक गोष्ट देशांतर्गत सामन्यात झाली. न्यूझीलंडमध्ये एका सामन्यात एका षटकात तब्बल ४३ धावा चोपण्याचा विक्रम झाला.

नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाच्या फलंदाजांनी स्थानिक वन डे क्रिकेट सामन्यात एका षटकात सहा षटकार ठोकले आणि तब्बल ४३ धावा जमवल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही एका षटकातील सर्वोच्च धावसंख्या आहे. जो कार्टर आणि ब्रेट हॅम्टन या दोघांनी नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाचे प्रतिनिधित्व करताना सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. दक्षिण आफ्रिकेतील गोलंदाज विलेम ल्युडीक याच्या गोलंदाजीपूवर हा विक्रम करण्यात आला. त्याने ९ षटकात १ बाद ४२ धावा दिल्या होत्या. परंतु अखेरच्या षटकात त्याला ४३ धावा पडल्या.

नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाने ७ बाद ३१३ धावांचा डोंगर उभा केल्या. त्यात कार्टरच्या ६६ चेंडूंत १०२ धावा आणि हॅम्टनच्या ६६ चेंडूंत ९५ धावांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात ६ षटकारांचा विक्रम आहे. वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने २००७च्या विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सच्या डॅन व्हॅन बुंगच्या एका षटकात सहा षटकार खेचले होते. त्यानंतर टी२० मध्ये भारताच्या युवराज सिंगने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडची धुलाई केली होती.

First Published on November 7, 2018 4:01 pm

Web Title: new zealand batsmans hit 43 runs in 1 over